विभागीया बॅडमिंटन स्पर्धेचे उदघाटन; 620 स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला

औरंगाबाद(प्रतिनिधि): औरंगाबाद जिल्हा शटल बॅडमिंटन संघटना आणि हिमांशु गोडबोले बॅडमिंटन अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठवाडास्तरीय अजिंक्यपद स्पर्धेचे उदघाटन  जिल्हाधिकारी  सुनील चव्हाण यांच्या हस्ते पार पडले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून  भुजंग खंदारे, मुख्य अभियंता, महावितरण तसेच जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे सचिव सिद्धार्थ पाटील, अतुल कुळकर्णी, गुरमित सिंग, अमित सानप, अजय खंडेलवाल, हिमांशू गोडबोले व नरेश गुंडले हे उपस्थित होते.

यावेळी सुनील चव्हाण यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या तसेच जिल्हा बडमिंटन संघटनेतर्फे आगामी काळात आयोजित राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

या अजिंक्यपद स्पर्धेत मराठवाड्यातील 620 स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून या स्पर्धा वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या बॅडमिंटन हॉल मध्ये आणि हेल्थ अँड हार्मणी बॅडमिंटन हॉल, सिडको एन 5 येथे दिनांक 14 ते 17 एप्रिल 2022 या कालावधीत खेळविल्या जाणार आहेत. या स्पर्धा 10 वर्षे वयोगटा पासून ते खुल्या वयोगटातील मुले आणि मुलींसाठी होणार आहे.

गुरुवार  14 रोजी  झालेल्या खेळात 10 वर्षा खालील मुलांच्या गटात चंद्राशू गुंडले याने संस्कार सांगुले याला (30-03) असे पराभूत केले तर शिवांश जंगाळे ने रुद्र पाटीलवर ( 30-04)ने मात केली, 10 वर्षा खालील मुलींच्या गटात विद्या मणियार ने रिद्धि पालकला (30-17) ने पराभूत केले, 13 वर्षा खालील मुलींच्या गटात दिव्यांशी खेडकर ने मनस्वी पटेलला (30-03) ने हरवले व मिताली सानप ने समस्या मूडकवी हिच्यावर (30-10)ने मात केली. 15 वर्षा खालील मुलांच्या गटात समय लोहाडे याने अबिर यूके याला (30-09) असे हरवले, पार्थ वाघ याने अजित पारदेवर रोमांचकारी (30-29) असा विजय मिळवला, अर्णव ओकने यश तांगडे यास (30-25) असे पराभूत केले. 17 वर्षा खालील मुलांच्या गटात हिमांशु गुंडलेने आदित्य जागिरदार यांच्यावर (30-10)ने मात केली तर सार्थक दळवी ने सुद्धा घनशाम पाटील ला (30-10) ने हरवले.

You might also like

Comments are closed.