औरंगाबाद (प्रतिनिधी): कोरियामध्ये आयोजित जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पोहोचलेला भारतीय संघ पदकांचा प्रबळ दावेदार असताना हात हलवून मायदेशी परतला. या प्रकारामुळे तायक्वांदो फेडरेशनचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
गोयांग (कोरिया) येथे २०२२ च्या जागतिक तायक्वांदो पुमसे चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, आव्हान सेओ-गु ,गोयांगमधील या स्पर्धेत अनेक नामवंत देशांचे संघ सहभागी झाले आहेत.भारतीय खेळाडूंना अशा खेळाडूंशी टक्कर देत कोरियातील वातावरणात खेळून आपली क्षमता दाखविण्याचा अनुभव मिळाला असता.
मात्र कोरिया आणि लगतच्या देशांत कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने व बुस्टर डोस घेतलेल्या खेळाडूंनाच खेळण्याची परवानगी कोरियन सरकारने दिल्याने याचा मोठा फटका भारताच्या सर्व सहभागी बावीस खेळाडूंना बसल्याने आपला संघ सिंगापूरमार्गे मुंबईत परतला आहे.
संघटना म्हणूते आम्ही जबाबदार नाही
एवढ्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना झालेले भारतीय तायक्वांदो खेळाडू हात हलवित परत येण्यास जबाबदार असलेल्या भारतीय तायक्वांदो संघटनेच्या अध्यक्षांनी हात झटकत बुस्टर डोस घेणे प्रत्येक खेळाडूची वैयक्तिक जबाबदारी होती, संघटनेची नाही, असे सांगत कोरियातील सरकारने स्पर्धेत सहभागी संघांना क्लारंटाईन केले होते, भारतात बुस्टर डोस १९० दिवसांनंतर घेतला जातो, स्पर्धेत प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना तो देण्यासाठी विशेष परवानगी मागितली होती, मात्र डोसच्या कालावधीचे गणित जुळले नाही.
खेळाडू स्वखर्चाने रवाना
कोरियातील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी झालेले भारतीय तायक्वांदो खेळाडू स्वखर्चाने सहभागी झाले होते, महासंघाला नव्याने अनुदान मिळाले नाही,असे सांगत भारतीय तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर यांनी हात झटकले.
लवकरच संघटना बैठक बोलावून खेळाडूंसाठी काही तरी मार्ग काढेल, कोरिया सरकारने लागू केलेल्या नियमांत आपले खेळाडू बसत नसल्याने त्यांना माघारी परतावे लागले याची संघटनेस खंत आहे, औरंगाबाद येथील निवडचाचणीतून जाहीर झालेल्या तायक्वांदोपटूंकडून दर्जेदार कामगिरीची अपेक्षा होती- नामदेव शिरगावकर (अध्यक्ष भारतीय तायक्वांदो)