• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, October 11, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी ईगल स्टार शूटिंग अकॅडमीचे सात खेळाडू पात्र

by pravin
September 19, 2026
in खेळ ( वैयक्तिक), नेमबाजी, राज्यस्तरीय, स्पर्धा
Reading Time: 1 min read
राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी ईगल स्टार शूटिंग अकॅडमीचे सात खेळाडू पात्र
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी  :

गुजरातमधील अहमदाबाद येथे ६ ते १३ सप्टेंबरदरम्यान झालेल्या पश्चिम विभागीय नेमबाजी स्पर्धेत ईगल स्टार शूटिंग अकॅडमीच्या सात खेळाडूंनी राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. या स्पर्धेत वरद भंडारेने रौप्यपदकही पटकावले, अशी माहिती अकॅडमीने पत्राद्वारे दिली.

वरद भंडारे, सार्थक जाधव, स्वराज कंकाळे, आयुष तावडे, कैवल्य अग्रवाल, नंदनी सिरसाट आणि उर्वेळा मोरे या खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. वरदने १० मीटर एअर पिस्तूल कनिष्ठ पुरुष गटात ४०० पैकी ३६७ गुण मिळवत रौप्यपदक जिंकले. त्याने २५ मीटर स्पोर्ट्स पिस्तूल प्रकारातही कामगिरी केली. इतर खेळाडूंनी १० मीटर एअर पिस्तूलच्या पुरुष व महिला गटांत सहभाग नोंदवला; स्वराज कंकाळेने २५ मीटर स्पोर्ट्स पिस्तूल प्रकारातही भाग घेतला.

या स्पर्धेत महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, गोवा आणि दीव-दमण येथील नेमबाज सहभागी झाले होते. अकॅडमीच्या माहितीनुसार, राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या सातही खेळाडूंनी अवघ्या वर्षभरापूर्वी नेमबाजीचा सराव सुरू केला होता. त्यांना आंतरराष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक सुंदर घाटे यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल अकॅडमी तसेच जिल्ह्यातील रायफल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

Tags: ईगल स्टार शूटिंग अकॅडमीछत्रपती संभाजीनगरनेमबाजीपश्चिम विभागीय नेमबाजी स्पर्धामहाराष्ट्र क्रीडाराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धावरद भंडारे
ShareTweetSend
Next Post
लोळगे आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा 2026 : एंजल किड्स, केंब्रिजसह सहा संघांचे दमदार विजय

लोळगे आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा 2026 : एंजल किड्स, केंब्रिजसह सहा संघांचे दमदार विजय

ताज्या बातम्या

R Ashwin speaking about Team India bowling weakness

टीम इंडियाचा पराभव का होतोय? आर. अश्विनने उघड केली सर्वात मोठी चूक

sports-panorama logo

IUSF: विद्यापीठ स्तरावरील खेळांमध्ये बदलाची नवी आशा

Shreyas Iyer on India's defeat against West Indies in 2nd T20

रांचीमध्ये २४९ धावा करूनही भारताचा पराभव; कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितली गोलंदाजांची मोठी चूक

Arunachal Pradesh cricket team likely to pull out of Ranji Trophy match against Nagaland

रणजी करंडक 2026-27: अरुणाचल प्रदेशचा संघ नागालँडविरुद्धच्या सामन्यातून माघार घेण्याच्या तयारीत

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.