आयपीएल मध्ये एक सामना होता तर यामध्ये चेन्नई समोर दिल्लीचे आव्हान होते. या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीच्या बळावर दिल्लीने तीन विकेट्सनी निसटता विजय मिळवला आहे. दोन गडी बाद करणारा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल या सामन्यात सामनावीर ठरला आहे.
दोन्ही संघ स्पर्धेच्या सुरुवातीपासून समान पॉईंटवर चालत होते मात्र दिल्लीने चेन्नईला पराभव करत आता चेन्नईच्या पुढे गेली आहे.दोन्ही संघ ऑलरेडी क्वालिफाय झालेली होती म्हणून हा सामना पॉइंट टेबल च्या दृष्टीने महत्त्वाचा नव्हता.
दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरविला.चेन्नई कडून फक्त अंबाती रायडू अर्धशतकी पारि करू शकला त्याच्याशिवाय कोणीही करू न शकल्यामुळे चेन्नईला मोठी धावसंख्या उभी करू शकली नाही.
चेन्नईने शतकात फक्त 136 धावा केल्या. धावांचा पाठलाग करीत असताना दिल्लीचेही एकापाठोपाठ बळी गेले. शिखर धवन सर्वाधिक 39 धावा केल्या तर हेट मायर ने शेवटी 28 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. चेन्नई कडून जडेजा आणि ठाकूरने प्रत्येकी दोन गडी बाद केले.आज मुंबई समोर राजस्थानचे आव्हान असणार आहे मुंबईला जर प्ले ऑफ मधील अशा पल्लवित ठेवायचे असतील तर हा सामना जिंकणे आवश्यक आहे तर दुसरीकडे राजस्थान स्पर्धेतून बाहेर झाली आहे.