जालना(प्रतिनिधी)-केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत केलो इंडिया या योजनेमधून देशातील विविध जिल्ह्यांमध्ये 1000 खेलो इंडिया सेंटर पुढील चार वर्षांमध्ये निर्माण करण्यात येणार असल्याचे आदेशित केलेले आहे.
आयुक्त खेलो इंडिया यांना सादर केलेल्या प्रस्तावातील महाराष्ट्रातील प्रती जिल्हा एक खेळ याप्रमाणे खेलो इंडिया सेंटर साठी मान्यता दिलेली आहे.
जालना परतूर तालुक्यातील बारा वर्षा आतील मुले व मुली दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजता सर्वे नंबर 488 मधील जिल्हा क्रीडा संकुल,अंबड,घनसावंगी व मंठा तालुक्यातील बारा वर्षा आतील मुले व मुली दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजता,भोकरदन जाफराबाद बदनापूर तालुक्यातील बारा वर्षा आतील मुले व मुली दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजता निवड चाचणी होणार आहे.