किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा धडाकेबाज फलंदाज युनिव्हर्स बॉस क्रिस गेल ने मध्ये सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेतून तडकाफडकी माघार घेतली. आयपीएलसाठी तयार करण्यात आलेल्या बायो-बलमध्ये घुसमट होत असल्याने त्याने माघार घेत असल्याचे स्पष्ट केले आहे. क्रिस गेल गेल्या महिन्यात कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत खेळत होता.
त्यावेळी तो एका बायो-बलमध्ये होता. त्यानंतर त्याला आयपीएलसाठी तयार करण्यात आलेल्या बायो-बबल मध्ये प्रवेश करावा लागला.सततच्या बायो-बबलच्या वातावरणामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची भीती असल्याने क्रिस गेल ने उर्वरित आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
‘गेल्या काही महिन्यांपासून मी आधी सी डब्ल्यू आय बायो-बबलचा भाग होतो. त्यानंतर सी पी एल साठी मला बायो-बबल मध्ये राहावं लागलं. आता पुन्हा मी आयपीएल साठीच्या बायो-बबलमध्ये आहे.
सातत्याने बायो-बबलमध्ये राहिल्याने माझी घुसमट होऊ लागली असून, माझ्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होत असल्याची चिन्हे आहेत.अशा परिस्थितीत मला स्वतः रिफ्रेश करणे गरजेचे असल्याने मी आयपीएलच्या उर्वरित सामन्यातून माघार घेत आहे, असे क्रिस गेल ने माघार घेण्याबाबत बोलत स्पष्ट केले. किंग्स इलेव्हन पंजाब ने ट्विट करत याची पुष्टी केली आहे.