कोल्हापूर(प्रतिनिधी)– कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अभिषेक निषाद, अभिनंदन गायकवाड यांची विनु मंकड ट्राफीसाठी महाराष्ट्र 19 वर्षाखालील क्रिकेट संघात निवड झाली आहे.स्पर्धेतील सामने दिल्ली येथे 28 सप्तेंबर ते 4 ऑक्टोबरपर्यंत होणार आहेत.
या स्पर्धेत महाराष्ट्र, तामिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, मध्यप्रदेश या संघांचा समावेश आहे. महाराष्ट्राचा पहिला सामना तामिळनाडु, दुसरा मध्य प्रदेश, तिसरा गुजरात, चौथा छत्तीसगड व पाचवा हिमाचल प्रदेशबरोबर होणार आहे.19 वर्षाखालील महाराष्ट्र संघाचा पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गंहुजेच्या मैदानावर 15 दिवस कॅम्प सुरू होता.
यातून महाराष्ट्राचा 19 वर्षाखालील अंतिम संघ निवडण्यात आला.त्यांना संस्थेचे अध्यक्ष चेतन चौगुले, सेक्रेटरी केदार गयावळ, माजी अध्यक्ष आर. ए.(बाळ) पाटणकर व माजी अध्यक्ष ऋतुराज इंगळे यांचे सहकार्य लाभले.