मार्शल आर्टच्या ब्लॅक बेल्ट परीक्षा, टेक्निकल सेमिनारचे आयोजन

औरंगाबाद- महा  शस्त्रांग   मार्शल आर्ट असोसिएशनच्या वतीने 3 ऑक्टोंबर वार रविवार भारतीय खेळ प्राधिकरण,औरंगाबाद (साई) येथे ब्लॅक बेल्ट परीक्षा, आणि टेक्निकल सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. डिफेन्स ड्रिल, स्पीड ड्रिल, पॅटर्न  र्ड्रिल, एयर शिल्ड, या चार प्रकारची परीक्षा होणार असून शस्त्रांग  मार्शल आर्ट चे संस्थापक ग्रँडमास्टर बिक्रम थापा हे महाराष्ट्रातील प्रशिक्षक विद्यार्थी यांची परीक्षा घेणार असून, त्यासोबत टेक्निकल सेमिनारचे देखील प्रशिक्षण देणार आहेत.

महाराष्ट्रातील 27 जिल्ह्यातील 80 प्रशिक्षक विद्यार्थी या ब्लॅक बेल्ट परीक्षेत आणि  टेक्निकल सेमिनारला उपस्थित राहणार आहेत आमदार अंबादास दानवे व ग्रँडमास्टर बिक्रम  थापा 9th डिग्री ब्लॅक बेल्ट चंडिगड पंजाब,संस्थापक शस्त्रांग मार्शल आर्ट, यांच्या शुभहस्ते 4 वाजता ब्लॅक बेल्ट चे वितरण  उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षक खेळाडूंना  होणार असून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उर्मिला मोराळे (क्रीडा उपसंचालक  औरंगाबाद विभाग)  प्रसाद  मिरकले (उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास जिल्हा परिषद औरंगाबाद)यांच्या प्रमुख प्रमुख उपस्थित होणार असल्याचे महा  शस्त्रांग मार्शल आर्टचे जनरल सेक्रेटरी मिलिंद काटमोरे,अध्यक्ष ऍड  सोपानराव शेजवळ यांनी सांगितले.

You might also like

Comments are closed.