औरंगाबाद (प्रतिनिधी):औरंगाबादच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत शासन, प्रशासन स्तरावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही, याच्या निषेधार्थ युथ पैंथर बैकवर्ड असोसिएशनचे एस.जी.गाडेकर यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
गाडेकर यांनी दिला उपोषणाचा इशारा
नावंदे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया तसेच औरंगाबाद विभागीय क्रीडा उपसंचालक यांच्या कार्यालयात रितसर तक्रार दाखल करण्यात आली होती. जिल्हा नियोजन समितीने गाडेकर यांना उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी सुचना दिल्या होत्या, मात्र याची दखल घेतली गेलेली नसल्याने गाडेकर यांनी उपोषणातून तरी न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
यासंबंधीच्या तपासात शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत पाठवण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये क्रीडा साहित्याच्या मूळ यादीवर बनावट यादी चिटकावण्यात आली असल्याचे आढळून आले. या प्रस्तावामध्ये मनपा हद्दीमधील मंजूर करण्यात आलेल्या ४३ शाळा आहेत. त्यापैकी अस्तित्वातच नसलेल्या 7 शाळांना हे क्रीडा साहित्य मंजूर केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
महापालिकेतर्फे कोणती कारवाई आज पर्यंत करण्यात आली नाही.मनपा प्रशासक तथा आयुक्त अस्तिक कुमार पांडे याविषयी कोणतीही कारवाई करत नाही क्रीडा मंत्री सुनील केदार या विषयी काही कारवाई करताना दिसत नाही. तसेच या विषयी तक्रारकर्ते शाम भोसले सरचिटणीस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी यांनी माहिती अधिकार मार्फत औरंगाबाद येथे झालेल्या चौकशीची माहिती आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिली नाही.
शासन आणि प्रशासन जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे यांना ” “अभय” कशासाठी? देत आहे असे क्रीडाप्रेमी मार्फत बोलण्यात येत आहे.