औरंगाबाद(प्रतिनिधी):औरंगाबाद महानगरपालिका व एन 3 लॉन टेनिस असोसिएशन द्वारा आयोजित जिल्हास्तरीय खुल्या लॉन टेनिस स्पर्धेची यशस्वी सांगता झाली. स्पर्धेचे बक्षीस वितरण औरंगाबाद महानगरपालिकेचे उपायुक्त तथा क्रीडा विभाग प्रमुख सौरभ जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. बक्षीस वितरण वेळी एन.3 लॉन टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी चव्हाण,सचिव डॉ.अनिल बहुखंडी, हे उपस्थित होते.
बक्षीस वितरण समारंभाचे सूत्रसंचालन डॉ.सुशील शिंदे तर आभार योगेश गायसमुद्रे यांनी केले.या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मनपा क्रीडा अधिकारी संजीव बालय्या यांच्यासह दिपा एंगडे, राहुल उगलमुगले, महेश परदेशी, चेतन केदार, अमोल राऊत, कुणाल ससाने, विजय मगरे, महेश फुले आणि मिलींद कांबळे यांनी परिश्रम घेतले.
जिल्हास्तरीय खुल्या लॉन टेनिस स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे –
10 वर्षाखालील मुले एकेरी
अली रझवी विजयी तर राघव शिंगाडे उपविजयी.
मुलींमध्ये मनस्वी राठोड विजयी तर राजवी बोरसे उपविजयी.
10 वर्षाखालील दुहेरी
मुलांमध्ये –
मुलींमध्ये – मनस्वी राठोड व राजवी बोरसे प्रथम तर निरल वांजूळे आणि आराध्या कोठारी दितीय.
12 वर्षाखालील मुले एकेरी
शिवराज जाधव विजयी तर यामीन सय्यद उपविजयी.
मुली – त्रिशा अरबाळे विजयी तर प्रांजली पंडुरे उपविजयी.
दुहेरी मुले – यामीन सय्यद आणि विश्वास चंद्रशेखरन विजयी तर अली रजवी व भाव्य संचेती उपविजयी.
14 वर्षातील –
एकेरी मुले – सोहम खैरनार विजयी तर पियुष गायकवाड उपविजयी.
एकेरी मुली – आर्या लिंगणवाड विजयी तर दिशा बाहेती उपविजयी.
दुहेरी मुले – पियुष गायकवाड व निनाद कुलकर्णी प्रथम तर यूग अग्रवाल व अहिल कल्याणकर उपविजयी.
दुहेरी मुली — संयुक्ता पगारे व आदिती गायकवाड विजयी तर सकिना रझवी व श्लोका अंलुरकर उपविजयी.
सोळा वर्षे मुले एकेरी – आशुतोष कवाडकर विजयी तर देवेश वाढई उपविजयी,
एकेरी मुली – समृद्धी मिरगे प्रथम तर अस्मी भालेराव द्वितीय.
दुहेरी मुलांमध्ये – आशुतोष कवाडकर व देवेश वाढई प्रथम तर यश गायकवाड व हर्ष द्वितीय.
दुहेरी मुलींमध्ये – अस्मि भालेराव व ऋतुजा खैरणार विजयी तर आनंदिता चोबे व प्रियांका उपविजयी.
18 वर्षाखालील मुलांमध्ये –
एकेरी – तेजस गायकवाड विजयी तर निखील मोरे उपविजयी.
एकेरी मुलींमध्ये – ऋतुजा खैरनार प्रथम तर संस्कृती राठोड द्वितीय.
दुहेरी मुलांमध्ये- सोहम मोहिते व सोहम खैरनार विजयी तर तेजस गायकवाड व आदित्य उपविजयी.
ओपन पुरुष गटामध्ये- विजयी प्रणव कोरडे तर उपविजयी चैतन्य चौधरी.
ओपन महिला गटांमध्ये –
अनुराधा शिरसाट विजयी तर तनवी दौलताबादकर उपविजयी.
ओपन पुरुष दुहेरी मध्ये –
डॉ. विजय मेहेर व रुपेश राय विजयी तर पियुष गुप्ता व कृष्णा मंत्री उपविजयी.
45 वर्षावरील पुरुष गटामध्ये एकेरीत – सत्यम वर्मा विजयी तर अनिल उबरहंडे उपविजयी.
45 वर्षावरील पुरुष दुहेरी गटामध्ये – डॉ. विजय मेहेर व गोपाल पांडे विजयी तर आशिष शर्मा व जीत सिंग उपविजयी.
65 वर्षावरील एकेरी पुरुष मध्ये – रूमी प्रिंटर विजयी तर पारस छाजेड उपविजयी.