ग्वाल्हेर :- पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ हाॅकी स्पर्धैत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ महिला हाॅकी संघाने पहिल्या सामन्यात भावनगर विद्यापीठ गुजरात चा ५ : १ गोलने दणदणीत पराभव केला,सामन्याच्या पहिल्या भागाच्या१२ व्या , दुसरा भागाच्या ४ थ्या मिनिटाला आणि १४ व्या मिनिटाला गोल करुन भाग्यश्री शिंदे ने हॅट्रीक केली
तर अनुक्रमे निर्जला शिंदे ने पेनाल्टी काॅर्नर वर तिसऱ्या भागात तर ४थ्या भागात श्रुती इधाटे ५ व्या मिनिटाला गोल करून विजय निश्चित केलाभावनगर तर्फे एकमेव गोल दुसऱ्या भागात झालाबाकी संपूर्ण सामन्यात बामू संघाचे वर्चस्व राहिले, सेंटर हाफ दीपाली शिंदे, आघाडीच्या फळीत कर्णधार सरूताई कुंभार , पुनम वाणी ,आणि नीशा भोयर यांनी उत्कृष्ट खेळ केला संघाचे प्रशिक्षक किशोर परदेशी व्यवस्थापिका शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा.मनिषा वाघमारे आहेत