नवी दिल्ली-भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली आदमी वर्ल्डकप नंतर t20 फॉर्मेट चे नेतृत्व सोडणार आहे. एवढंच नाही तर तो आयपीएलमध्येही आरसीबीचा कर्णधार राहणार नाही.विराट च्या या घोषनेनंतर आता टीम इंडियातील या आणखी एका सदस्याने राजीनामा दिला आहे. टी-20 वर्ल्ड कप नंतर आपण हे पद सोडणार असल्याचे त्याने सांगितले आहे.
यूएई मध्ये 17 ऑक्टोबर पासून टी-20 वर्ल्ड कप सुरू होत आहे. ही स्पर्धा संपल्यानंतर भारतीय टीमचे मुख्यत स्ट्रेन्थ आणि कंडिशनिंग कोच निक वेब पद सोडण्याची घोषणा केली आहे. त्यांनी इंस्टाग्राम वर एक पोस्ट शेअर करत आपला निर्णय सांगितला आहे.
नीक वेब यांनी पोस्ट मध्ये काय लिहिलंय ?
मला गेल्या दोन पेक्षा अधिक वर्षांपासून भारत आणि भारतीय क्रिकेट टीम चे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. या काळात एक टीम म्हणून आणि बरंच काही मिळवले आहे. आम्ही विजय मिळवले, आमचा पराभव झाला, पण आम्ही प्रत्येक दिवशी सातत्याने आव्हानांचा सामना केला.
मी काही दिवसापूर्वी बीसीसीआयला विनंती केली आहे की टी-20 वर्ल्डकप नंतर माझा करार पुढे वाढवू नये. हा एक सोपा निर्णय नव्हता पण मला कुटुंबाची काळजी घ्यायची आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की की भारताच्या टीमने टी-20 वर्ल्ड कप जिंकावा यासाठी मी सर्व प्रयत्न करेन. तुम्हा सर्वांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद. असं वेब त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले.