जालन्याची सलोनी जिल्ह्यात पहिली महिला ब्लॅक बेल्ट.

जालना(प्रतिनिधी)-जालन्याची विद्यार्थिनी संभाजीनगर येथील रहिवासी सलोनी गायकवाड हे नुकतीच जिल्ह्यातून पहिली महिला ब्लॅक बेल्ट झाली. तिने नुकतेच झालेल्या मिक्स मार्शल आर्ट ब्लॅक बेल्ट परीक्षा मध्ये चांगली कामगिरी केली आहे.
तिने केलेल्या चांगल्या कामगिरीबद्दल तिचे शहरभर आतून स्वागत तसेच कौतुक व सत्कार होत आहे. सलोनी ची आई मोरे गायकवाड ह्या एका शासकीय रुग्णालयात अत्यावश्यक सेवा देऊन आपल्या एकुलती एक मुलगी ला चांगले संस्कार व शिक्षा देऊन सलोनी ला ब्लॅक बेल्ट चे शिक्षण दिले. सलोनीला प्रशिक्षक दत्ता पवार यांचे मोलाचे योगदान लाभले आहेत.
तिने केलेल्या कामगिरीबद्दल याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री तथा जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांनी सलोनीचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले आहे. तसेच वकरच होणार्या नॅशनल स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या.
Comments are closed.