जालना (प्रतिनिधी)-जालना जिल्हा क्रीडा संकुलाची दयनीय अवस्था सर्वात प्रथम स्पोर्ट्स पॅनोरमा दाखवले होते. स्पोर्ट्स पॅनोरमा बातमीचा दणका म्हणून जिल्हाधिकारी यांनी तातडीने जिल्हा क्रीडा संकुलाची पाहणी देखील केली. आता या मुद्द्यावर पालकमंत्री राजेश टोपे यांनी सुद्धा याच्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
स्पोर्ट्स पॅनोरमा प्रतिनिधींशी बोलताना पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले की, क्रीडासंकुलासाठी निधी आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणार तसेच त्यासाठी राज्य क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्याशी सुद्धा आम्ही भेटलो असे ते म्हणाले आणि बेस्ट आर्किटेक मार्फत क्रीडा संकुलाची कार्यबद्ध अंमलबजावणी करू असे आश्वासन त्यांनी दिले.
स्पोर्ट्स पॅनोरमा प्रतिनिधीने असा प्रश्न केला की शासनाने दिलेल्या व्यायामशाळा अनुदान, आणि क्रीडांगण अनुदान दलालामार्फत वाटपाचे केंद्र बनलेले आहे. त्यामुळे मलिदा लाटण्याच्या नादात जाण्याच्या क्रीडा संस्कृतीकडे ,खेळाडूंच्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. अशा डेपोटेशनवर नेमणूक केलेल्या दलालांना बडतर्फ करून शासनाच्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात यावी कारण हे दलाल अधिकाऱ्यांना सुरक्षा प्रदान करतात असा आरोप क्रीडा संघटनेमार्फत करण्यात येत आहे.
या वर बोलताना पालकमंत्री टोपे म्हणाले की, यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे तसेच जे डेपोटेशन वर लावण्यात आलेले आहे पण ते चुकीचे काम करत असेल अशा लोकांवर कारवाई करणार असे ते म्हणाले.
भोंगळ कारभाराबद्दल पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले की सगळं सेंटेराईज करण्याची गरज आहे, तसेच क्रीडा विभागातील काम न करणारे लोकांबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे, तसेच पालकमंत्री या नात्याने बेस्ट क्रीडा सुविधा पुरविणे असा माझा निर्धार आहे.