स्पोर्ट्स पॅनोरमा(प्रतिनिधी)-आज आयपीएल मध्ये एक सामना आहे. या सामन्यामध्ये पंजाब समोर कोलकात्याच्या आव्हान आहे तर यामध्ये पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नवोदित सलामीवीर व्यंकटेश अय्यर याने आपली सांगली लय कायम ठेवत धडाकेबाज अर्धशतक ठोकले. त्याच्या अर्धशतकाच्या मदतीने कोलकत्ता ने 20 षटकात 165 धावांपर्यंत मजल मारली. आता पंजाब समोर दुसऱ्या गावामध्ये 166 धावांचे आव्हान असणार आहे. पंजाब कडून स्टार खेळाडू ख्रिस गेल या सामन्यात मुकला आहे तर मयंक अगरवाल ची वापसी झाली आहे. तर दुसरीकडे कोलकाता कडून टिम सिफर्ट हा पदापर्ण करणार आहे तर शिवम बाबीही संघात परतला आहे.
नाणेफेक जिंकून पंजाबचा कर्णधार के एल राहुल ने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. कोलकत्ता ची सुरुवात चांगली नाही राहिली. सलामीवीर शुभमन गील लवकरच तंबूत परतला. त्यानंतर व्यंकटेश अय्यरणे राहुल त्रिपाठी च्या साथीने सुरेख भागीदारी केली व संघाला चांगल्या स्थितीत नेऊन ठेवले. नितीश राणा ने ही जलद 31 धावांचे योगदान दिले. तळामध्ये मात्र कोलकाता जळगाव थोडा गडगडला. कोलकाता कडून व्यंकटेश अय्यर ने सर्वाधिक 67 धावा केल्या तर राहुल त्रिपाठी व नितीश राणा ने प्रत्येकी 34 व 31 धावांचे योगदान दिले.पंजाब कडून डावखुरा जलदगती गोलंदाज अर्षदीप सींगणे 3 तर रवी बिष्णोईने दोन गडी बाद केले. दोन्ही संघाच्या प्ले ऑफ मध्ये पोहोचण्याच्या दृष्टीने हा सामना अतिशय महत्त्वाच्या असल्यामुळे अतिशय रोमांचक सामना बघावयास मिळणार आहे.