औरंगाबाद (प्रतिनिधी): क्रीडा व युवक सेवा ,महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आदेशानुसार नागरिक ,खेळाडू यांना व्यायामाच्या सुविधा निर्माण करणे ,तरुण पिढीमध्ये व्यायामाची आवड जोपासणे यासाठी जिल्हास्तरावर व्यायामशाळा विकास अनुदान योजनेअंतर्गत व्यायामशाळा बांधकाम आणि व्यायाम साहित्य देण्यात येते . यामध्ये आर्थिक अथवा शासनाची दिशाभूल करण्यात आलेली आहे का? याकरिता संस्थांना मंजूर करण्यात आलेले व्यायामशाळा बांधकाम व साहित्य बाबत चौकशी करण्याचे निर्देश उपसंचालक औरंगाबाद उर्मिला मोराळे यांनी दिलेले आहे .
यामध्ये स्वतः उर्मिला मोराळे ,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय औरंगाबाद येथून चंद्रशेखर घुगे, सचिन पुरी , जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना येथून मोहम्मद शेख ,संतोष वाबळे , हिंगोलीचे क्रीडा अधिकारी शैलेंद्र गौतम या सहाजणांची चौकशी समिती दि . ०७ ते ०९ डिसेंबर २०२१ या कालावधीत सर्व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले. पत्राद्वारे सन २०१६-१७ ते सन २०२०-२१ वर्षातील व्यायामशाळा विकास योजने अंतर्गत मंजूर केलेल्या संस्थांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली यांचेद्वारा व्यायामशाळा बांधकाम व व्यायामसाहित्य पुरविण्यात आले किंवा कसे याबाबत संस्थेला भेट देवून वस्तुनिष्ठ माहिती तपासणी करून त्याबाबतचा अहवाल क्रीडा व युवक सेवा ,महाराष्ट्र राज्य, पुणे,आयुक्त ओम प्रकाश बकोरीया यांना सादर करण्याचा आदेश उपसंचालक उर्मिला मोराळे यांनी दिला आहे.यामध्ये चौकशीत काय समोर येते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे .