औरंगाबाद(प्रतिनिधी)- एम. पी. पी. स्पोर्ट्स पार्क येथे नुकताच (दि.६ सोमवार) रोजीआयोजित कै. सुधीरदादा जोशी स्मृती ‘ क्रीडा तपस्वी ‘ राज्यस्तर पुरस्कार औरंगाबाद शहरातील विजय रामचंद्र लोखंडे यांना प्रदान करून गौरव करण्यात आला. त्यांना प्रसिद्ध उद्योगपती मानसिंग पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी पूर्णवाद स्पोर्ट्स अॅण्ड हेल्थ प्रमोशन अकॅडेमीचे अध्यक्ष अॅड गुणेशदादा पारनेरकर, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष माजी विभागीय आयुक्त कृष्णा भोगे, पूर्णवाद स्पोर्ट्स अॅण्ड हेल्थ प्रमोशन अकॅडेमीचे सचिव डॉ. मकरंद जोशीआणि एम. पी. पी. स्पोर्ट्स पार्कचे अॅड. गोपाळ पांडे हे मंचावर उपस्थित होते. विजय रामचंद्र लोखंडे यांनी खोखो क्षेत्रात मार्गदर्शक व संघटक म्हणून भरीव कार्य केले आहे. त्यांनी शहरात तीहून आधिक राज्य व राष्ट्रीयस्तर खेळाडू निर्माण केले आहेत. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व रोख पारितोषिक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
कार्याक्रमचे प्रास्ताविक डॉ. मकरंद जोशी यांनी केले. यावेळी त्यांनी पूर्णवाद स्पोर्ट्स अॅण्ड हेल्थ प्रमोशन अकॅडेमीचे कार्य मांडून पुरस्कार देण्यामागची भूमिका स्पष्ट केली. तसेच एम. पी. पी. स्पोर्ट्स पार्क येथील सुविधा यांची माहिती देत भविष्यातील उद्दिष्ट्ये मांडली गोपाळ पांडे यांनी मांडली.सत्काराला उत्तर देताना श्री. लोखंडे यांनी हा पुरस्कार मी अजिंठा क्रीडा मंडळ व माझ्या खो- खो खेळाडूंच्या वतीने स्वीकारत आहे आहे प्रतिपादन केले. कुठल्याही पुरस्काराची अपेक्षा न करता केवल खो-खो-च्या विकासाचा ध्यास घेऊन आजपर्यंत केलेल्या कार्याची पुरस्कार म्हणून मला पावती मिळाली आणि त्यातही आम्ही ज्यांना क्रीडा क्षेत्रात आदर्श मानले त्यांच्या नावाने पुरस्कार मिळाल्याने कृतकृत्य झालो.
प्रमुख पाहुणे मानसिंग पवार यांनी आपल्या मनोगतात सुधीरदादांनी निर्माण केलेल्या क्रीडा संस्कृतीच्या पाठीमागे त्यांची अध्यात्मिक ताकद उपयोगाला आली असे प्रतिपादन केले. तसेच त्यांचा वावर सर्वच क्षेत्रात होता व त्यांना विविध प्रशासकीय अधिकारी , राजकारणी आणि उद्योगपती यांनी नेहमीच मदत केली टी केवळ त्यांनी स्वतः साठी काहीही न मागता खेळाडूंसाठी कार्य केले. तसेच एम. पी. पी. स्पोर्ट्स पार्क येथे भविष्यात क्रीडा विद्यापीठ उभे राहू शकते आणि त्यासाठी शक्य टी मदत करण्याचे आश्वासन दिले. कै. सुधीरदादांचे कार्य त्यांनी निर्माण केलेले खेळाडू आज कार्यकर्त्याच्या रूपात समर्थपणे पुढे नेत आहेत याचा विशेष आनंद व्यक्त केला.
यानंतर अध्यक्षीय समारोप करताना अॅड गुणेशदादा पारनेरकर यांनी कै. सुधीरदादा यांचे वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तुत्व हे गुण आम्ही घेण्याचा प्रयत्न करत आहोत असे सांगत आठवणींना उजाळा दिला. श्री. लोखंडे यांच्या कार्याचा गौरवोद्गार करून चागल्या शाररीक व मानसिक आरोग्य राखण्यासाठी सर्वांनी एखादातरी खेळ खेळलाच पाहिजे असे प्रतिपादन केले. खेळातून अध्यात्मिक प्रगती साधता येते म्हणजे आत्मबल वृद्धिंगत होते ज्याचे आजचा काळात अत्यंत महत्व आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित रोंघे यांनी तर आभार प्रदर्शन संदीप गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमासाठी विजय लोखंडे यांचा पुरस्कार सोहळा पाहण्यासाठी पदवीधर आमदार सतीश चव्हाण, सुधीरदादांचे बंधू श्याम जोशी, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त रमेश भंडारी, बैजू पाटील, अण्णा वैद्य तसेच शारीरिक शिक्षण संचालक, क्रीडा शिक्षक, पूर्णवाद परिवारातील साधक, औरंगाबाद जिम्नॅस्टिक्स संघटनेचे पदाधिकारी , आजी माजी खेळाडू आणि शहरातील क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.