कोरोनाच्या प्रभावामुळे 2021 ते 22 या वर्षात शाळेत स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले नाही. एकविध क्रीडा संघटनांनी क्रीडा स्पर्धेचे आयोजन न करता निवड चाचणी प्रक्रियेद्वारे संघाची निवड केली. सहावी अथवा त्यानंतरच्या शाळेय वर्षात आयोजित केलेल्या पात्र क्रीडा प्रकारात सहभागी असला तरी दहावी अथवा त्यानंतर च्या शाळेवर वर्षात आयोजित केलेल्या पात्र क्रीडा प्रकारात सहभागी असला तरी दहावी व बारावी मध्ये शिकत असलेल्या वर्षात क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी नसल्याने क्रीडा गुण सवलतीपासून वंचित राहू शकतो. खेळ खेळाडू क्रीडा गुण सवलतीपासून वंचित राहू नये यासाठी संबंधितांना निर्देश द्यावेत अशी विनंती क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अपर मुख्य सचिव यांना केली असून ही विनंती मान्य झाल्यास दहावी व बारावी शिकत असलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांची क्रीडा गुण सवलतीपासून वंचित राहणार नाहीत.
दहावी व बारावी परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या राज्य राष्ट्रीय व व आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढवून देण्याबाबत सुधारित नियमावली तयार करण्यात आली आहे .तसेच शासनाने राज्यात क्रीडा संस्कृती च्या वाढीसाठी दहावी व बारावी इयत्तेत शिकत असलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा गुणांची सवलत देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. या शासन निर्णया मधील तरतुदीनुसार जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा गुण सवलत देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येते.
सहावी पासून दहावी व बारावी पर्यंत शिकत असलेल्या कोणत्याही वर्षात आयोजित पात्र क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा गुणांची सवलत देण्यात तर तूद आहे. तसेच क्रीडा स्पर्धेचे आयोजन सहावीपासून पुढच्या वर्षात कधी झाले नसले तरीही इयत्ता दहावी व बारावी मध्ये शिकत असलेल्या वर्षात संबंधित खेळाडूंनी क्रीडा प्रकारात सहभागी होणे आवश्यक आहे.
कॉमेडीच्या प्रभावामुळे 2021 22 या शैक्षणिक वर्षात शाळेत क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले नसून लाभार्थी खेळाडू इयत्ता सहावी अथवा त्यानंतर शाळे वर्षात आयोजित केलेल्या पात्र क्रीडा प्रकारात सहभागी असला तरी दहावी व बारावी मध्ये शिकत असलेल्या वर्षात क्रीडा स्पर्धा सहभागी नसलेल्या क्रीडा गुण सवलतीपासून वंचित राहू शकतो. कोबिर परिस्थितीमुळे ही अट शिथिल करण्यात यावी अशी विनंती लेखी पत्राद्वारे क्रीडा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी केली आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे विद्यार्थ्यांना यापूर्वीच या वर्षात आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धा मधील सहभाग विचारात घेऊन 2020 21 वर्षाकरिता सवलतीचे गुण देण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांना देण्यात आलेला होता. त्याचप्रमाणे 2021 22 या वर्षाकरिता सवलतीचे क्रीडा गुण देण्याबाबतचे निर्देश संबंधितांना द्यावेत अशी विनंती क्रीडा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी लेखी पत्राद्वारे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव यांना केली आहे. त्यामुळे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा गुण सवलतीचा प्रश्न सुटण्याची चिन्हे दिसून आहे.