गुजरातच्या मेहसाणा येथील 16 वर्षीय बॅडमिंटन खेळाडू तसनी मीरने इतिहास घडविला आहे. ओलंपिक पदक विजेती सायना नेहवाल आणि पी व्ही सिंधू यांनीही जमलेली कामगिरी करून दाखवत ती अंडर-19 च्या महिलांच्या गटात प्रथम क्रमांकावर आरूढ झाली आहे. ज्युनियर खेळाडू असतानाही अशी कामगिरी सायना आणि सिंधू चा काय कोणत्याही भारतीय खेळाडूला अजून जमलेला नाही ज्युनियर वर्ल्ड रँकिंग 2011 मध्ये सुरू झाले. त्यावेळी साईना यासाठी पात्र नव्हती आणि सिंधू या क्रम वारीच्या दुसऱ्या क्रमांकावर होती.
भारतात साठी इतिहास रचणारी तसनी याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की मी यामुळे खूप आनंदी आहे सिंधू आणि सायना सारखीच कामगिरी करून पुढे जाण्याचा प्रयत्न मी करत आहे सीनियर लेव्हलवर पुढील ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकण्याचे माझे स्वप्न आहे आणि त्यासाठी मी सातत्याने सराव करत आपल्या खेळांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्नही करते आहे.
आर्थिक गुंतवणूक यामुळे थांबला होता खेळ तिने सांगितले की एक वेळ अशी आली होती जेव्हा वडिलांच्या आर्थिक तंगी मुळे माझे खेळणे थांबले होते. मात्र त्याच वेळी प्रयोजक मिळाल्यामुळे मला खेळ पुढे सुरू ठेवता आला आणि त्यामुळेच मी आज या जागी पोहोचू शकले तसनी तीन वर्ष गोपीचंद अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेतले आहे. यानंतर गुवाहाटी येथील इन्स्टिट्यूटमध्ये तिचे प्रशिक्षण सुरू आहे.
तसनीच्या वडिलांनी सांगितले की तिने वयाच्या सहाव्या वर्षापासून बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली होती… तर आतापर्यंत वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये बावीस स्पर्धा जिंकलेल्या आहेत तिने दोन वेळा एशियन चॅम्पियनशिप ही जिंकलेली आहे.