तायक्वांदो बेल्ट परीक्षा संपन्न

जालना(प्रतिनिधी)नुकतीच  तायक्वांदो विद्यार्थ्यांना बेल्ट वितरण.. ऑलिंपिक असोसिएशन महाराष्ट्र  तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या आधिपत्याखाली असलेल्या  तायक्वांदो असोसिएशन ऑफ जालना च्या विद्यार्थ्यांना जिल्ह्याचे चिफ़ टेक्निकल डायरेक्ट व सचिव सचिन आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच झालेल्या बेल्ट परीक्षेत यश संपादन केले.

यामध्ये कलर बेल्ट बेल्ट परीक्षेत गुणवंत खेळाडू पुढीलप्रमाणे : 1) राजेंद्र सातारे, 2)विराज कातकडे, 3) कोमल गायकवाड, 4) अमन बनकर, 5) अजय पंडित, 6) नवतेश डुरे, 7) स्वराज जाधव, 8) प्रसाद वाघमारे, 9) यश गोगडे, 10) शंकर्षण शहापुरे, 11)अबोली पवार, 12) कुमार सातारे.

वरील सर्व खेळाडूंना तायक्वांदो असोसिएशन ऑफ जालना चे अध्यक्ष अरविंद देशमुख जनता व पोलिस समन्वय समितीचे समन्वयक धनसिंग सूर्यवंशी, विजय कमळे पाटील , माजी नगरसेवक रमेश अण्णा जाधव, प्रशिक्षक मयुर पिवळ आदि उपस्थित होते.

You might also like

Comments are closed.