बीड – पालघर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य सीनियर तायक्वांदो स्पर्धेत बीडचा राष्ट्रीय खेळाडू पारस राजेशलाल गुरखुदे यांने अंतिम फेरीपर्यंत झेप घेऊन रौप्यपदक जिंकले तर पोलीस उपनिरीक्षक युवराज पोठरे व आंतरराष्ट्रीय खेळाडू कु. दीक्षा बनकर यांनी २ कांस्यपदके पटकावली, अशी माहिती बीड जिल्हा संघटनेचे महासचिव तथा मुख्य प्रशिक्षक डॉ. अविनाश बारगजे यांनी दिली.
पालघर जिल्ह्यातील विरार येथील ग्रीन पॅराडाईज रिसॉर्ट मध्ये ३४ वी महाराष्ट्र राज्य सीनियर तायक्वांदो स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचे उदघाटन आमदार हितेश ठाकूर यांच्या हस्ते पार पडले. या स्पर्धेत बीड जिल्हा संघटनेच्या ९ सीनियर खेळाडूंनी सहभाग नोंदवला. कोविडच्या प्रदीर्घ कालावधीनंतर राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा पालघर येथे पार पडल्या. तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री नामदेव शिरगावकर व महासचिव संदीप ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली या राज्यस्तरीय स्पर्धा प्रथमच अत्याधुनिक सेंन्सर सिस्टम वर पार पडली. या राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये बीडचा राष्ट्रीय खेळाडू पारस राजेशलाल गुरखुदे याने अंतिम फेरीपर्यंत झेप घेऊन रौप्य पदक पटकावले. तायक्वांदो खेळातील बीडचा राष्ट्रीय पदक विजेता युवराज सुभाष पोठरे याने वयाच्या ३५ व्या वर्षी राज्यस्तरीय स्पर्धेत कांस्यपदक जिंकण्याची कामगिरी नोंदवली. सोबतच बीडची आंतरराष्ट्रीय खेळाडू कु. दीक्षा मनीष बनकर हीने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारून कांस्यपदक जिंकले.
आंतरराष्ट्रीय खेळाडू अविनाश भारत पांचाळ, राष्ट्रीय खेळाडू विद्यासागर बागडे, सागर किर्दत, रंजीत काकडे, प्रवीण पाटोळे व परमेश्वर भंडारी ( वडवणी) यांनी बीड जिल्हा संघाचे प्रतिनिधी केले. राष्ट्रीय प्रशिक्षक डॉ.अविनाश बारगजे यांच्या बीड जिल्हा क्रीडा संकुलातील तायक्वांदो प्रशिक्षण केंद्रात सराव करणारे हे खेळाडू आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय विद्यापीठ खेळाडू सचिन कातांगळे व नितीन आंधळे ( वडवणी ) यांनी बीड जिल्हा संघ प्रशिक्षक म्हणून काम पाहिले.
राष्ट्रीय पंच शेख अनिस याने स्पर्धेमध्ये पंच म्हणून बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. या खेळाडूंचे डॉ. भारतभूषण क्षीरसागर, डॉ. राजेश क्षीरसागर, नितीनचंद्र कोटेचा, सुनील राऊत, जयश्री बारगजे, दिनकर चौरे, बंशी राऊत, भारत पांचाळ, मनेश बनकर, डॉ. विनोदचंद्र पवार, श्रीकांत पाटील, प्रा. पी. टी. चव्हाण, शशांक साहू व सोमनाथ ढाकणे यांनी अभिनंदन केले आहे.