राज्यस्तरीय नेहरू हॉकी स्पर्धा ; पंधरा वर्षीय मुले मुंबई विभाग आणि सतरा वर्षीय मुली पुणे क्रीडा प्रबोधिनी विजयी

पुणे (प्रतिनिधी): शिवछत्रपती क्रीडा संकुल , महाळुंगे – बालेवाडी पुणे येथे क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या विद्यामाने आयोजित  नुकत्याच पार पडलेल्या  राज्यस्तरीय जवाहरलाल नेहरू चषक हॉकी स्पर्धेत १५ वर्षीय मुले वयोगटात अंतिम सामन्यात मुंबई विभागाच्या डॉन बॉस्को स्कूल , माटुंगा संघाने पुणे विभाग गौतम पब्लिक स्कूल अहमदनगर यांच्या विरुद्ध 3-० गोल करत दणदणीत विजय  मिळवला. १७ वर्षीय मुली वयोगटात अंतिम सामन्यात क्रीडा प्रबोधिनी ,पुणे संघाने कोल्हापूर विभाग न्यू इंग्लिश स्कूल नूल ता. गडहिंग्लज यांच्या विरुध्द 3-१ गोल करत विजय संपादन केला .

या सामन्यात १५ वर्षीय मुले वयोगट मुंबई विभाग विरुद्ध पुणे विभाग यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई विभागाकडून रिषी जथन याने ८ व्या मिनिटाला संघाला प्रथम गोल प्राप्त करून दिला, स्वयम गांगुर्डे याने पाठोपाठ १७ व्या मिनिटाला दुसरा गोल मिळवला त्याचबरोबर ५३ व्या मिनिटाला श्रद्धेश खामकर याने संघाला तिसरा गोल करत संघात विजयाची मजबूत स्थिती निर्माण होण्यास हातभार लावला. पुणे विभाग उपविजेता ठरला आणि तृतीय स्थाना करता कोल्हापूर विभाग आदर्श बालक विद्या मंदीर,इस्लामपूर विरुद्ध अमरावती विभाग साई विद्यालय लोहारा,यवतमाळ यांच्या सामन्यात ३-० गोल करून कोल्हापूर विभागा कडून २० व्या मिनिटाला सुरज राठोड याने  प्रथम गोल केला, जय राऊत याने  २४ व्या मिनिटाला  दुसरा आणि ५० व्या मिनिटाला तिसरा  गोल करत संघाला विजय मिळवून दिला .

पंधरा वर्षीय मुलेत मुंबई विभाग
राज्यस्तरीय जवाहरलाल नेहरू चषक हॉकी स्पर्धेत १५ वर्षीय मुले वयोगटातील विजेत्या मुंबई विभागाच्या डॉन बॉस्को स्कूल, माटुंगा संघाला चषक देताना महाराष्ट्र राज्य क्रीडा आयुक्त ओम प्रकाश बकोरीया आदी.

 

१७  वर्षीय मुली वयोगटात  क्रीडा प्रबोधिनी पुणे विरुद्ध कोल्हापूर विभाग यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात सर्वप्रथम  कोल्हापूर विभागाकडून सानिका माने हिने २४ व्या मिनिटास गोल केला त्यानंतर  क्रीडा प्रबोधिनी,पुणे विभागाकडून सुकन्या धावरे हिने ३७ व्या आणि ४९ व्या मिनिटास  एकतर्फी दोन  गोल केले , काही क्षणातच  तनुश्री कडू हिने ४९ व्या मिनिटाला संघाला तिसरा  गोल करत विजय मिळवून दिला . तृतीय क्रमांकाकरिता पुणे विभाग सेंट जोसेफ स्कूल खडकी विरुद्ध नाशिक विभाग एकलव्य आदिवासी स्कूल नंदुरबार यांच्यात ४ -० असा सामना झाला. या सामन्यात पुणे विभागाकडून सिद्धी गवळी हिने ७ व्या आणि ३८ व्या मिनिटास  दोन गोल आपल्या नावे केले,  त्या पाठोपाठ स्वानंदी कदम हिने ३८ व्या मिनिटाला तिसरा गोल करत प्रज्ञा खरातने ५२ व्या मिनिटाला गोल करत विजयामध्ये चौथ्या गोलाची भर घालत विजय मिळवून दिला .

सतरा वर्षीय मुलीत पुणे क्रीडा प्रभोधिनी
राज्यस्तरीय जवाहरलाल नेहरू चषक हॉकी स्पर्धेत १७  वर्षीय मुली वयोगटातील विजेत्या क्रीडा प्रबोधिनी ,पुणे संघाला चषक देताना महाराष्ट्र राज्य क्रीडा आयुक्त ओम प्रकाश बकोरीया आदी.

तसेच या स्पर्धेतील विजेते संघ राष्ट्रीय स्पर्धेकरता महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करणार आहेत . प्रथम ,द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या संघांना महाराष्ट्र राज्य क्रीडा आयुक्त ओम प्रकाश बकोरीया यांच्या हस्ते संघास चषक देऊन गौरविण्यात आले या प्रसंगी सहसंचालक चंद्रकांत कांबळे , उपसंचालक सुहास पाटील ,नवनाथ फरताडे ,सहाय्यक संचालक उदय पवार ,लेखाधिकारी आश्विनी बोऱ्हाडे ,तालुका  क्रीडा अधिकारी गिता साखरे यांची उपस्थिती होती आणि सर्वांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या .

You might also like

Comments are closed.