छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी): हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने औरंगाबाद जिल्हा ऑलिम्पिक संघटनेतर्फे खेळासाठी योगदान देणाऱ्या खेळाडु, क्रीडा शिक्षक आणि संघटकांचा गौरव करण्यात येतो. यंदाचा संघटनेचा जीवनगौरव पुरस्कार खो खो खेळाचे ज्येष्ठ संघटक रमेश भंडारी यांना प्रदान करण्यात येणार आहे.
हा गौरव सोहळा रविवारी (ता. २८) सकाळी ९ वाजता संत एकनाथ रंगमंदिर येथे होणार आहे. यावेळी राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे ओलिम्पियन तथा अर्जुन पुरस्कारार्थी दत्तू भोकनळ आणि यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमात जिल्हाभरातील विविध राष्ट्रीय खेळाडूंचा देखील गौरव होणार आहे. पुरस्कारार्थी पुढील प्रमाणे:
आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार –
डॉ. निलेश गाडेकर (सोयगाव), निलेश गायकवाड (पैठण), बाबासाहेब माने (सिल्लोड), विजय बारवाल (कन्नड), भाऊसाहेब खरात (वैजापूर), नामदेव पवार (फुलंब्री), कैलास वाहूळे (औरंगाबाद), राजेंद्र गंगावणे (खुलताबाद), निलेश माने (गंगापूर).
सत्कारमूर्ती आंतरराष्ट्रीय खेळाडू :
अदिती निलंगेकर (पॅरा ऑलिम्पिक), सृष्टी साठे (सुवर्ण पदक, आशियाई कनिष्ठ बॉक्सिंग), शर्वरी कल्याणकर (सुवर्ण पदक, आशियाई कनिष्ठ बॉक्सिंग), तनिशा बोरामणीकर (रौप्य पदक, आशियाई बुद्धिबळ), गौरव म्हस्के (कांस्य पदक, आशियाई ज्युनियर बॉक्सिंग), कशीष भराड (आशियाई तलवारबाजी), वैदेही लोया (आशियाई तलवारबाजी), साक्षी चितलांगे (रौप्य पदक, आशियाई बुद्धिबळ), तेजस शिरसे (आशियाई अथलेटिक्स स्पर्धा), रिद्धी हत्तेकर, सिद्धी हत्तेकर (आशियाई जिम्नॅस्टिक स्पर्धा), अभय शिंदे (आशियाई तलवारबाजी), श्रेयस जाधव (आशियाई तलवारबाजी), संदीप गुरमे (आयर्नमॅन) यांच्यासह विविध खेळांतील राष्ट्रीय खेळाडू, क्रीडा मार्गदर्शकांचा देखील सत्कार केला जाणार आहे.
औरंगाबाद ऑलिम्पिक अस्सोसिएशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार सोहळा यावर्षी, २८ ऑगस्ट रविवारी संत एकनाथ रंगमंदिर येथे सकाळी ९:३० वाजता आयोजित केलेला असून सर्व पुरस्कार्थी खेळाडूंनी आणि विविध खेळ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी याची नोंद घेऊन आपल्या खेळाच्या खेळाडूंना वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन करावे. महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे तसेच ऑलिंपियन व अर्जुन पुरस्कार्थी दत्तू भोकनाल यांच्या शुभहस्ते खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे.
पंकज भारसाखळे
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, उपाध्यक्ष डॉ. उदय डोंगरे, सचिव गोविंद शर्मा, सहसचिव डॉ. दिनेश वंजारे, कोषाध्यक्ष विश्वास जोशी आदींनी केले आहे.