जालना (नाजीम मणियार)--जालना जिल्हा क्रीडा संकुलाची दयनीय अवस्था झालेली आहे याची बातमी स्पोर्ट्स पॅनोरमा-मार्फत प्रकाशित करण्यात आली होती. जालना क्रीडा संकुल मैदानावर दररोज सुमारे चारशे ते पाचशे खेळाडू सराव करतात. या क्रीडा संकुलावर अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडू घडलेले आहेत. त्यामुळे याच क्रीडा संकुलाची दयनीय अवस्था असल्यामुळे खेळाडूंना सर्वांमध्ये अडचण येऊ शकते. दयनीय अवस्था झालेल्या क्रीडा संकुलाची बातमी सर्वात प्रथम स्पोर्ट्स पॅनोरमा ने दाखवले होते.
आता त्यांच्या बातमीचा दणका म्हणून लवकरच ज्यांना जिल्हा क्रीडा संकुलाचा कायापालट होणार आहे जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी जिल्हा क्रीडा संकुलाची पाहणी करून क्रीडा संकुलाची कायापालटचे निर्देश दिले. तसेच चालू आहे क्रीडा विभागातील सर्व सदस्यांसोबत पाहणी करून त्यांच्यासोबत क्रीडा विकासाच्या संदर्भात चर्चा केली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख, संतोष वाबळे, मोहम्मद शेख, इस्माइल खान व क्रीडा संकुल जालना येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा क्रीडा संकुलाची दयनीय अवस्था: राज्य सरकार व प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष.