दुबई- गुरुवारी (७ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्सला इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामात ५३ व्या सामन्यात पंजाब किंग्स संघाने ६ विकेट्सने पराभूत केले. असे असले तरी या सामन्यानंतर सर्वाधिक चर्चा चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरच्या साखरपुड्याची झाली. त्याने त्याची प्रेयसी जया भारद्वाजबरोबर सामन्यानंतर स्टेडियममध्येच साखरपुडा उरकला. त्याच्या सारखपुड्याचे चेन्नई सुपर किंग्स संघाने जोरदार सेलिब्रेशन केले.
या सामन्यानंतर हॉटेलमध्ये परतल्यानंतर चेन्नई संघातील खेळाडू, त्यांचे कुटुंबिय आणि स्टाफमधील सदस्यांकडून दीपकच्या साखरपुड्याचे जोरदार सेलिब्रेशन झाले. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्सच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर शेअर करण्यात आला आहे.
https://www.instagram.com/p/CUu4P7HFscm/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again
या व्हिडिओमध्ये दिसते की चेन्नई संघ हॉटेलमध्ये प्रवेश करतो, तेव्हा दीपक आणि जयाचे जोरदार स्वागत केले जाते. यानंतर हे दोघेही केक कापून तो एकमेकांना भरवून तोंड गोड करतात. केक कापल्यावर मात्र, चेन्नईचे खेळाडू मस्तीच्या मूडमध्ये येतात. यावेळी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी चाहरला पकडतो. त्यावेळी बाकी खेळाडू येऊन दीपकच्या चेहऱ्यावर आणि जर्सीवर केक फासतात.
चेन्नई विरुद्ध पंजाब सामना संपताच दीपक खेळाडूंचे कुटुंबिय बसतात त्या स्टँडमध्ये गेला आणि त्याने सर्वांसमोर तिथे काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेल्या जयाला गुडघ्यावर बसून लग्नाची मागणी घातली. तिनेही क्षणाचाही विलंब न करता त्याच्या मागणीला होकार दिला. तिने होकार दिल्यानंतर दीपकने तिच्या बोटात अंगठी घातली.
त्यानंतर त्याने त्याच्या खिशातून आणखी एक अंगठी काढून तिच्याकडे दिली. तिने ती दीपकच्या बोटात घातली. या क्षणाला दीपकने खास क्षण म्हटले आहे. तसेच या गोड क्षणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
Special and one of the best moment of my life #love pic.twitter.com/jsCEhiAUZY
— Deepak chahar 🇮🇳 (@deepak_chahar9) October 7, 2021