नॉर्वे येथे सुरू असलेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताची कन्या अंशुमन लेकीने इतिहास रचला आहे. रेसलिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये अंशू मलिक ने रोपे पदकाची कमाई केली आहे.जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई करणारी अंशू मलिक पहिली भारतीय कुस्तीपटू ठरली. यूरोपच्या सोलोमिया वीनिकला पराभूत करून अंशू ने स्पर्धेच्या फायनल्स मध्ये प्रवेश केला होता. आजच्या सामन्यात अंशू ने अमेरिकेच्या हेलन मारोलीस शी दोन हात केले. पण तिला रोप्य पदकावर समाधान मानावे लागले. हेलन मारोलीसने 57 किलो वजनी गटात विश्वविजेतेपद पटकावले.
त्याचसोबत, 59 किलो वजनी गटात भारताच्या सरिता मोर हिणे ही कांस्य पदकाची कमाई केली. सरिताला सेमीफायनलमध्ये हार पत्करावी लागली. त्यामुळे तिने आज कांचन पदाच्या लढतीत सहभाग घेत सामना जिंकला तिने स्वीडनच्या कुस्ती पटूला 8-2 असे पराभूत केले.