औरंगाबाद(प्रतिनिधी)-नवरात्रीच्या मुहूर्तावर औरंगाबादची सायकलपटू सोनम शर्मा तिने तमाम सायकलपटूंसाठी प्रेरणादायी अशी कामगिरी करून दाखवली आहे. औरंगाबादच्या या कुशल सायकल पाठवणे एकाच वर्षात दोन वेळा सुपर रैंडोंअयर्सचा किताब संपादन केला आहे.
वर्षभरात ठराविक किलोमीटरचा प्रवास करण्याचा उद्देश समोर ठेवत, या स्पर्धांचे आयोजन केलं जातं. सायकल टूरिझमचा छंद जपणाऱ्या सोनम शर्मा हिने या वर्षाभरातून दोन वेळा हे टार्गेट पूर्ण करत एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.
रैंडोंनीअर्सचा चा किताब कसा मिळतो?
बीआरएम म्हणजेच ब्रेवेट्स डॉ रँडन्यूअर्स मोंडियाक्स या मूळ फ्रेंच वाक्याचा इंग्रजी अर्थ ‘वर्ल्ड वाईट हायकर्स पेटेंट्स’ म्हणजे ‘जगभर कुठेही दूरवर रपेटीला जाणारा’फ्रान्समधील एडॉक्स क्लब ते रशियन ही संस्था सायकल टुरिझमला प्रोत्साहन देते.ही स्पर्धा एका वर्षात दोनशे किलोमीटर तीनशे किलोमीटर चारशे किलोमीटर आणि सहाशे किलोमीटर अंतराची मालिका असते. ही स्पर्धा ऑक्टोबर ते ऑक्टोबर 2020/2021 या काळात ही मालिका पूर्ण करायची होती ही पार केल्यानंतर या स्पर्धेचा किताब मिळते. औरंगाबादच्या सोनमणे दोन वेळा ही मालिका पूर्ण केली. दोन वेळा स्वतःच्या नावावर किताब करणारी मराठवाड्यातील पहिली महिला सायकलपटू ठरली आहे.
सायकल पटू चा कस वाढविण्यासाठी स्पर्धा-
बीआरएमच्या ॲप वर रजिस्ट्रेशन केल्यानंतर सायकल पटूनां या स्पर्धेत सहभागी होता येते. स्वतःसोबत इतरांनाही पुढे घेऊन जाणे हा बीआरऐमचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे ही शारीरिक आणि मानसिक सहनशक्ती कस वाढवणारी स्पर्धा आहे.
सोनमवर अभिनंदनाचा वर्षाव एका वर्षात दोन वेळा पूर्ण केल्या बद्दल सोनम याच्यावर सायकल प्रेम इकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. औरंगाबाद जिल्हा सायकल संघटनेचे अध्यक्ष निखिल कचेश्वर,सचिव चरणजित सिंग ,सहसचिव अतुल जोशी ,अमोघ जैन, मनिष खंडेलवाल,कविता जाधव इत्यादींनी शुभेच्छा देत सत्कार केले.