आयपीएल 2021 च्या प्लेऔफ च्या चार टीम जवळपास निश्चित झाले आहेत. दिल्ली,चेन्नई ,बंगलोर आणि कलकत्ता या चार संघ प्ले ऑफ मध्ये खेळताना दिसतील. आयपीएलच्या लीग स्टेजचा शुक्रवारी अखेरचा दिवस आहे.पण गुरुवारपर्यंत प्ले ऑफ शर्यतीत कोलकत्ता मुंबई पंजाब आणि राजस्थान या टिम होत्या. कोलकाता ने राजस्थानचा 85 धावांनी पराभव केल्यामुळे फक्त राजस्थानची नाहीतर पंजाब आणि मुंबईच्या स्वप्नांचा ही चुराडा झाला आहे.
सनरायझर्स हैदराबाद ची टीम या आधीच प्लेऔफच्या शर्यतीतून बाहेर झाली होती.राजस्थान रॉयल्सने कोलकाता विरुद्ध मॅच मध्ये विजय मिळविला असता तर मुंबईने शुक्रवारी हैदराबाद चा पराभव करून ऑफ मध्ये प्रवेश केला असता. पण आता राजस्थानचा पराभव झाल्यामुळे मुंबईच ही प्ले ऑफ मध्ये प्रवेश करण्याचे स्वप्न संपुष्टात आल्या. त्यामुळे राजस्थान ने हम तो डुबे सनम तुम्हे मी ले डुबे या बॉलिवूडमधील प्रसिद्ध डायलॉग याची प्रचिती केली.