औरंगाबाद(प्रतिनिधी)-डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आज होणाऱ्या सिनेट बैठकीवर राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य तसेच विद्यापीठ विकास मंचाचे प्राध्यापक, प्राचार्य यांच्या मधून निवडून आलेले सिनेट सदस्य यांनी विद्यापीठ प्रशासनाने सुरु असलेल्या अनागोंदी कारभाराबाबत निषेध नोंदवण्यासाठी व सभागृहांमध्ये या सर्व प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून निशब्द रित्या आपला निषेध नोंदविला.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून विद्यापीठामध्ये मागील काही वर्षांपासून सुरु असलेल्या अनागोंदी कारभाराबाबत संतप्त असलेल्या सिनेट सदस्यांनी विद्यापीठातील विद्यार्थिनींच्या अधिकाऱ्यांमार्फत चाट द्वारे अश्लील संभाषण करणाऱ्या जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांना सेवा मुक्त करण्यात यावे विद्यापीठातील यापूर्वीही अनेक वेळा संशोधक विद्यार्थ्यांचे शोषण करणाऱ्या व सातत्यपूर्ण रीतीने विद्यार्थ्यांना पैशाची मागणी करणाऱ्या गीता पाटील यांना विद्यापीठ सेवेतून सेवा मुक्त करावे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यापीठाची बदनामी केल्याबद्दल डॉ गीता पाटील यांच्यावर कठोर कारवाई करावी. विद्यापीठ प्रशासन कुणाच्या दबावामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यास धजावत नाही याचा शोध घ्यावा व त्यांना सेवा मुक्त करण्यात यावे. यासाठी विद्यापीठ प्रशासनाने त्वरित कारवाई करावी परीक्षा विभागातील हजारो विद्यार्थ्यांना अनुपस्थित दाखवणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना शून्य मार्क देणाऱ्या परीक्षा व्यवस्थेतील परीक्षा नियंत्रकावर कारवाही करून त्यांना ही सेवा मुक्त करण्यात यावे, जो पर्यंत सर्व विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होत नाही तोपर्यंत पुढील प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवण्यात यावी. प्राध्यापकांच्या कॅस मध्ये होणारा भ्रष्टाचार त्वरित बंद करण्यात यावा. विद्यापीठाने नॅनो टेक्नॉलॉजी, अप्लाइड मॅथेमॅटिक्स यासोबत बंद केलेले इतर विषय हे सुरू करण्यात यावे व संबंधित विषय अकॅडमीक