लवकरच क्रीडा क्षेत्र खुले, जोश आहे तसाच कायम ठेवा

महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन

राज्यातील विविध खेळातील खेळाडू आणि क्रीडा प्रशिक्षकांनी निराश न होता जोश जसा आहे तसाच तो कायम ठेवावा, आगामी काळामध्ये क्रीडा क्षेत्र खुले केले जाईल असे आश्वासन महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिले आहे.

 

 

महाराष्ट्र शासनाने कोरोनाचे राज्यात वाढते प्रमाण लक्षात घेता लॉकडाऊन आणि कडक निर्बंध घातले असून, यामध्ये मैदाने आणि इतर क्रीडा प्रकारांचा ही समावेश करण्यात आला आहे. गेली चार पाच दिवस राज्यातील क्रीडा क्षेत्रांमधून कडक निर्बंध शिथील करण्यात यावे यासाठी खेळाडू, प्रशिक्षक, पालक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाराष्ट्र ओलम्पिक संघटनेचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर यांना हजारो मेल आणि निवेदने पाठवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर मंगळवारी महाराष्ट्र ओलम्पिक संघटनेचे कार्यकारी पदाधिकारी यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासमवेत एक महत्त्वाची बैठक झाली.

 

 

या बैठकीत महाराष्ट्र ओलम्पिक संघटनेचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर यांनी राज्यातील क्रीडा क्षेत्रातील सध्याची परिस्थिती आणि निवेदन याबाबत सखोल माहिती दिली. क्रीडा क्षेत्रावरील कडक निर्बंधाबाबत बैठकीत चर्चा झाली त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले ,आगामी काळामध्ये राज्याच्या यांच्याशी विचार विनिमय करून लवकरच क्रीडा क्षेत्राच्या हिताचा निर्णय घेऊ .तसेच राज्यातील खेळाडू आणि प्रशिक्षक यांनी निराश न होता जसा जोश आहे तसाच ठेवावा. येणाऱ्या काळामध्ये लवकरच क्रीडा क्षेत्र खुले केले जाईल राज्याची सध्याची परिस्थिती लक्षात घेता सर्व शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी बंद असल्यामुळे सध्या तरी हा निर्णय आता घेता येणार नाही. परंतु, लवकरात लवकर निर्णय घेऊन क्रीडाक्षेत्राचा विचार केला जाईल. असे अजित पवार म्हणाले. व सरचिटणीस नामदेव शिरगावकर यांनी आश्वासन दिले.

You might also like

Comments are closed.