तीन फलंदाजी माघारी!लंचपर्यंत आफ्रिकेचं शतक पूर्ण

केपटाऊनमध्ये तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाऊनमध्ये तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना खेळवला जात आहे. आज या सामन्याचा दुसरा दिवस असून पहिल्याच दिवशी दोन्ही संघात जोरदार टक्कर पाहायला मिळाली.आज आफ्रिका संघाने ८ षटकात १ बाद १७ धावांरून पुढे खेळायला सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा कप्तान डीन एल्गरला काल लवकर तंबूत धाडण्यात भारताला यश आले. तत्पूर्वी विराट कोहलीने भारतीय संघात पुनरागमन करत नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आफ्रिकेच्या वेगवान आणि तिखट माऱ्यासमोर विराट वगळता भारताचे फलंदाज ढेपाळले आणि त्यांचा पहिला डाव २२३ धावांवर संपुष्टात आला. विराटने ७९ धावा करत संघाला आधार दिला.

 

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेचा कप्तान डीन एल्गरला (३) लवकर तंबूत पाठवत भारताला पहिले यश मिळवून दिले. पहिल्या दिवसअखेर एडन मार्कराम आणि नाईट वॉचमन केशव महाराज नाबाद होते. दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होताच बुमराहने सुरेख पद्धतीने मार्करामचा (८) त्रिफळा उडवला. संघाचा अर्धशतकी पल्ला गाठण्यापूर्वी केशव महाराजही (२५) उमेश यादवच्या गोलंदाजीवर तंबूत परतला. त्यानंतर कीगन पीटरसन आणि रुसी व्हॅन डर ड्यूसेन यांनी संघाला सावरलं. या दोघांनी संयमी भागीदारी रचत संघाचे शतक फलकावर लावले. लंचपर्यंत दक्षिण आफ्रिका संघाने ३५ षटकात ३ बाद १०० धावा केल्या. पीटरसन (४०) तर ड्युसेन (१७) धावांवर खेळत आहे.

 

 

भारताचा पहिला डाव

मयंक अग्रवाल आणि केएल राहुल यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. भारताचं अर्धशतक पूर्ण होण्यापूर्वी हे दोघे तंबूत परतले. डुआन ऑलिव्हियर ने राहुलला (१२) तर कगिसो रबाडाने एडन मार्करामला (१५) झेलबाद केले. लंचपर्यंत विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी भारताचा डाव सावरला. लंचनंतर भारताने शतक पूर्ण केले पण डाव गडबडला. चांगल्या लयीत खेळणाऱ्या पुजाराला वेगवान गोलंदाज मार्को जानसेनने झेलबाद केले. त्यानंतर आलेला अजिंक्य रहाणे रबाडाचा बळी ठरला. पुजाराने ७ चौकारांसह ४३ तर रहाणेने ९ धावा केल्या. चहापानापर्यंत भारताने ५४ षटकात ४ बाद १४१ धावा केल्या. चहापानानंतर भारताने पंतच्या रुपात आपला पाचला फलंदाज गमावला. जानसेनने त्याला बाद केले. दरम्यान विराटने संयमी अर्धशतक फलकावर लावले. १६७ धावांत भारताने ५ फलंदाज बाद झाले. त्यानंतर भारताचे एकापाठोपाठ एक फलंदाज बाद होत राहिले. विराटने आक्रमक पवित्रा धारण करत झटपट धावा जोत संघाची धावसंख्या दोनशेपार पोहोचवली. तो आज शतकाचा दुष्काळ संपवणार असे वाटत असताना बाद झाला. ऑफ स्टम्पबाहेरील चेंडूवर विराटला रबाडाने तंबूत धाडले. विराटने २०१ चेंडूंचा सामना करत १२ चौकार आणि एक षटकारासह ७९ धावा केल्या. विराट बाद झाल्यानंतर आफ्रिकेने भारताचा पहिला डाव लवकर संपुष्टात आणला. पहिल्या डावात भारताने ७७.३ षटकात सर्वबाद २२३ धावा केल्या. आफ्रिकेकडून रबाडाने ४, जानसेनने ३ बळी घेतले. लुंगी एनगिडी, डुआन ऑलिव्हियर आणि केशव महाराज यांना प्रत्येकी एक बळी मिळाला.

You might also like

Comments are closed.