औरंगाबाद(प्रतिनिधी)राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधत क्रीडा भारतीतर्फे आंतरराष्ट्रीय पातळीवर औरंगाबादचा झेंडा फडकवणाऱ्या खेळाडूंच्या मातांचा ‘वीर जिजामाता पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्कयात आले . देवगिरी बँकेचे अध्यक्ष जलदुत किशोर शितोळे आणि उद्योजिका ज्योती शितोळे यांच्या हस्ते पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. क्रीडा भारतीचे अध्यक्ष पंकज भारसाखळे यांची ह्यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.
क्रीडा क्षेत्रातील शिवबा घडवण्यासाठी मातांनी जिजाऊंचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन किशोर शितोळे यांनी वीर जिजामाता पुरस्कार वितरण सोहळ्यात केले.
डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या दामूअण्णा दाते सभागृहात आयोजित या गौरव सोहळ्यात आंतरराष्ट्रीय किर्तीचे क्रिकेटपटू अंकित बावणे यांच्या मातोश्री कांता बावणे, आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू खुशी डोंगरे यांच्या मातोश्री काजल डोंगरे, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू साक्षी चितलांगे यांच्या मातोश्री प्रीती चितलांगे, राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा संघटक डॉ.उदय डोंगरे यांच्या मातोश्री मुक्ताबाई डोंगरे, आंतरराष्ट्रीय धावपटू तेजस शिरसे यांच्या मातोश्री लक्ष्मी शिरसे, आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिकपटू ऋग्वेद जोशी यांच्या मातोश्री मानसी जोशी, आंतरराष्ट्रीय तलवारबाज अभय शिंदे यांच्या मातोश्री सुरेखा शिंदे, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू तनीषा बोरामणीकर यांच्या मातोश्री रेणुका बोरामणीकर, आंतरराष्ट्रीय बॉक्सिंगपटू शर्वरी कल्याणकर यांच्या मातोश्री पल्लवी कल्याणकर, आंतरराष्ट्रीय दिव्यांग जलतरणपटू सागर बडवे यांच्या मातोश्री कांचन बडवे, आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल प्रशिक्षक संदीप ढंगारे यांच्या मातोश्री सुरेखा ढंगारे तसेच राष्ट्रीय स्वयंसिद्धा प्रशिक्षका लता कलवार यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई कलवार यांना क्रीडा भारतीतर्फे वीर जिजामाता पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.संदीप जगताप यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा भारतीचे संकर्षण जोशी, बाळासाहेब वाघमारे, विश्वास जोशी, प्रशांत जमधडे, मानसी बर्दापूरकर यांनी परिश्रम घेतले व आभार विनायक राऊत यांनी मानले.