वॉशिंग्टन सुंदरची घेणार जागा हा खेळाडू

२२ वर्षीय युवा फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदर करोना पॉझिटिव्ह

टीम इंडियाला १९ जानेवारीपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका खेळायची आहे. मालिकेपूर्वी भारतीय (India vs South Africa) संघासाठी वाईट बातमी समोर आली. २२ वर्षीय युवा फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदर करोना पॉझिटिव्ह आढळला आहे . तो मालिकेबाहेर पडला आहे. त्यांच्या जागी जयंत यादवचा समावेश करण्यात आला आहे. जयंत आयपीएलच्या शेवटच्या हंगामात मुंबई इंडियन्सचा भाग होता. सध्या तो कसोटी संघासोबत दक्षिण आफ्रिकेत आहे. तो त्याच्या कारकिर्दीत फक्त एकच एकदिवसीय सामना खेळला आहे. त्याने फक्त एक धाव काढली आहे.

 

 

भारताच्या निवड समितीने जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत दुखापतग्रस्त झालेल्या मोहम्मद सिराजचा बॅकअप म्हणून एकदिवसीय संघात वेगवान गोलंदाज नवदीप सैनीचाही समावेश केला आहे.

जयंत यादवच्या एकदिवसीय कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, त्याने एका सामन्यात नाबाद एक धावा काढली. याशिवाय त्याने एक विकेटही घेतली आहे. तो विशाखापट्टणम येथे न्यूझीलंडविरुद्ध ऑक्टोबर २०१६ मध्ये एकमेव एकदिवसीय सामना खेळला होता.

You might also like

Comments are closed.