आफ्रिकेच्या वेगवान आणि तिखट माऱ्यासमोर विराट वगळता भारताचे फलंदाज टिकले नाहीत .आणि त्यांचा पहिला डाव 223 धावांवर संपुष्टात आला विराटने 79 धावा करत संघाला आधार दिला. पहिल्या दिवस अखेर आफ्रिका संघाने आठ षटकात १ बाद १७ धावा केल्या दक्षिण आफ्रिकेचा कर्णधारडीन एल्गरला लवकर तंबूत धाडण्यात भारताला यश आले दिवसात अखेर एडन मार्कराव आणि नाईट वॉचमन केशव महाराज नाबाद राहिले.
विराट कोहलीने भारतीय संघात पुनरागमन करत नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मयंक अग्रवाल आणि के एल राहुल यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. भारताचे अर्धशतक पूर्ण होण्यापूर्वी हे दोन तंबूत परतले.