प्रो कबड्डी लीग २०२१ ला काही दिवसांपूर्वी धमाक्यात सुरुवात झाली आहे. प्रो कबड्डीचा यंदाचा हा ८ वा हंगाम आहे. हंगामाच्या २२ व्या दिवशीचा (१२ जानेवारी) पहिला सामना ‘हरियाणा स्टिलर्स’ आणि ‘यूपी योद्धा’ संघात झाला. या सामन्यात उभय संघांमध्ये विजयासाठी शेवटपर्यंत अटीतटीची लढत पाहायला मिळाली. परंतु अखेरीस हा सामना ३६-३६ ने बरोबरीत सुटला.
हरियाणा विरुद्ध यूपी संघांमध्ये झालेल्या सामन्याच्या पहिल्या हाफपर्यंत दोन्ही संघ बरोबरीच्या लढतीत होते. यूपीने एका गुणाची सरसी घेत पहिल्या हाफपर्यंत खेळ १४-१३ अशा स्थितीत आणला होता. पुढे दोन्ही संघाच्या खेळाडूंनी दमदार खेळ दाखवत सामन्यात आघाडी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र शेवटी हा सामना बरोबरीत सुटला आहे.