औरंगाबाद:-शिवछत्रपती पुरस्कार विजेते आदित्य अंकुश तळेगावकर यांना प्रथम पुण्यतिथी निमित्त एम जे बॉईज डान्स अकॅडमी वर आदरांजली देण्यात आली. मागच्या वर्षी २४ ऑगस्टला आदित्य यांनी वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. शंभरहून अधिक मेडल्स त्यांनी जिमनॅस्टिक या क्रीडा प्रकारात मिळवले होते. ‘कोरिया’ येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पयनशिपमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व ही केले होते. त्यांच्या या कार्याला बघता महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च मानला जाणारा ‘शिवछत्रपती पुरस्कार’ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्यावेळी त्यांच्या परिवरातले सदस्य, एम जे बॉईज ग्रूप, एंजल किड्स इंटरनॅशनल स्कूलचे संचालक तुकाराम मुंडे, स्पोर्ट्स पॅनोरमाचे संचालक प्रविण वाघ, सागर वाघ आदींची उपस्थित होते.