• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 22, 2025
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

भारतीय बॅडमिंटन महासंघाच्या समितीत औरंगाबादच्या शिरीष बोराळकर यांचा समावेश

by pravin
May 18, 2022
in बातम्या, बॅडमिंटन, राष्ट्रीयस्तरीय
भारतीय बॅडमिंटन महासंघाच्या समितीतऔरंगाबादच्या शिरीष बोराळकर यांचा समावेश
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

औरंगाबाद (प्रतिनिधी): औरंगाबाद जिल्हा शटल बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्षव शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त शिरीष बोराळकर यांची भारतीय बॅडमिंटन महासंघाच्यामार्केटिंग व पब्लिसिटी समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. भारतीय बॅडमिंटन महासंघाने २०२२ ते २०२६ या कालावधीसाठी विविधसमित्यांची स्थापना केली आहे.

त्यात मार्केटिंग व पब्लिसिटी या समितीवर सदस्य म्हणूनऔरंगाबाद जिल्हा शटल बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष शिरीष बोराळकर यांची निवड करण्यात आली.या समितीचे अध्यक्ष महासंघाचे कोषाध्यक्ष अरुण लखानी हे आहेत. या समितीत उदित दत्ता,संदीप हेबळे, गौतम महांता, पुल्लेला गोपीचंद, नवरोझ मुनवर यांचा समावेश आहे. संजय मिश्राहे या समितीचे समवन्वयक आहेत.शिरीष बोराळकर हे एकेकाळचे उत्तम बॅडमिंटनपटू व क्रिकेटपटूराहिले आहेत. एक उत्कृष्ट क्रीडा संघटक म्हणून त्यांची ख्याती आहे.

औरंगाबाद जिल्हाक्रिकेट संघटनेचे ते सहसचिव म्हणून कार्यरत आहेत. एकेकाळी त्यांनी महिला क्रिकेटलाचालना दिलेली आहे. विविध खेळांना ते चालना देण्याचा प्रयत्न करीत असतात. भारतीय बॅडमिंटनमहासंघाच्या मार्केटिंग व पब्लिसिटी समितीवर सदस्य म्हणुन शिरीष बोराळकर यांची पहिल्यांदाचनिवड झाली आहे. ही निवड ते सार्थ ठरवतील अशी खात्री औरंगाबादच्या क्रीडा क्षेत्रातूनव्यक्त होत आहे.  वय चोरीला आळा घालण्याकरितानेमण्यात आलेल्या समितीवर महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष प्रदीप गंधे यांचीसदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

यात गोव्याचे संदीप हेबळे यांची देखील निवड करण्यातआली आहे. शिस्तभंग समितीचे चेअरमन म्हणून गोव्याचे नरहर ठाकूर यांची निवड करण्यात आलीआहे. तांत्रिक अधिकारी समितीवर महाराष्ट्राचे गिरीश नातू यांची सदस्य म्हणून वर्णीलागली आहे. बॅडमिंटन खेळाच्या विकासासाठी नेमण्यात आलेल्या समितीवर महाराष्ट्राचेप्रतनिधित्व श्रीकांत वाड हे सदस्य म्हणून करणार आहेत. स्पर्धा समितीवर महाराष्ट्राचेप्रतिनिधित्व मंगेश काशीकर हे सदस्य म्हणून करणार आहेत. महाराष्ट्राचे जगदीश जोशी यांचीअर्थ समितीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. कोअर कमिटीत भारतीय बॅडमिंटन महासंघाचेकोषाध्यक्ष महाराष्टाचे अरुण लखानी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या समितीत एकूणसहा जणांचा समावेश आहे.

Tags: Latest sports newslatest sports news marathiMarathi sports newsShirish Boralkar of Aurangabad is a member of the Badminton Federation of India
ShareTweetSend
Next Post
राहुल टाक राष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून नियुक्त

राहुल टाक राष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून नियुक्त

ताज्या बातम्या

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ - शांभवी जोडीचा अचूक निशाणा

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ – शांभवी जोडीचा अचूक निशाणा

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.