औरंगाबाद(प्रतिनिधी): कर्नाटक येथील बेल्लारी येथे २० ते २६ मे दरम्यान राष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाच्या वतीने मुलांच्या सब-ज्युनिअर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्र कडून प्रशिक्षक म्हणून औरंगाबादच्या राहुल टाक यांची नियुक्ती करण्यात आली.राहुल त्यांनी यापूर्वी अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेत कोच म्हणून काम पाहिले आहे.
आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत कांस्यपदक विजेता गौरव मस्के ला देखील राहुल टाक यांनी प्रशिक्षण दिले होते.राहुल टाक यांच्या नियुक्तीबद्दल राज्य संघटनेचे उपाध्यक्ष तथा शहर संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार श्रीकांत जोशी, शहर संघटनेचे उपाध्यक्ष एकनाथ जाधव, सचिव पंकज भारसाखळे, कोषाध्यक्ष आरोह बर्वे, नीरज भारसाखळे, डॉ. प्रदीप खंद्रे, सतीश भट्ट आदींनी अभिनंदन केले.