आंतर विदयापीठ सॉफ्टबॉल संघात संतोष आवचार ची निवड

छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी): पंजाब युनिव्हर्सिटी (चंदीगड) येथे दि 5 ते 9 एप्रिल 2023 दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय सॉफ्टबॉल आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धेत शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या एम.पी.एड द्वितीय वर्षाचा विद्यार्थी संतोष चंद्रकांत आवचार याची डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापिठाच्या संघांत निवड झाली व हा विद्यापीठ संघांचे प्रतिनिधीत्व करणार आहे.तत्पूर्वी परळी वैजनाथ(बीड)येथे झालेल्या अंतर महाविद्यालयीन सॉफ्टबॉल स्पर्धा/निवडचाचणीत यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली होती.

विद्यापीठ संघातील खेळाडूचे सराव शिबीर हें 28 मार्च ते 2 एप्रिल 2023 दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील क्रीडा विभागाचे मुख्य मैदान येथे पार पडणार आहे. या निवडीबद्दल माजी मंत्री मा. जयदत्त अण्णा क्षीरसागर, नवगण शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. दीपाताई क्षीरसागर, संस्थेचे सचिव डॉ.भारत क्षीरसागर यांनी कौतुक केले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रवींद्र काळे यांनी पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी उपास्थित महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.माधव घोडके,डॉ.चौघुले एस बी,डॉ.भीमा माने, प्रा.परवेज खान,तकिक शामसुंदर, अनिल मेहरकर उपस्थित होते.

तसेच या निवडीबद्दल छत्रपती संभाजीनगर सॉफ्टबॉल संघटनेचे अध्यक्ष डॉ. दत्ताभाऊ पाथरीकर, उपाध्यक्ष डॉ. फुलचंद सलामपुर,सचिव गोकुळ तांदळे,शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारर्थी डॉ.उदय डोंगरे दीपक रुईकर,प्रा.राकेश खैरनार,प्रा.प्रदीप बोरसे प्रशिक्षक प्रा.गणेश बेटूदे,सागर रुपवते,अक्षय बिरादार,सचिन बोर्डे यांनी अभिनंदन केले.

You might also like

Comments are closed.