प्रतिनिधी-आज आयपीएल मध्ये राजस्थान समोर हैदराबाद चे आव्हान होते. तर यामध्ये जेसन रॉय व कर्णधार केन विल्यमसन यांच्या अर्धशतकी खेळी मुळे हैदराबाद ने राजस्थान वर दणदणीत विजय मिळविला आहे. हैदराबाद ने राजस्थानचा सात विकेटने पराभव केला आहे. या विजयामुळे हैदराबादचा जास्त फायदा झालेला नाही कारण हैदराबाद स्पर्धेतून पहिलेच बाहेर झालेली आहे. राजस्थान ने हैदराबाद समोर 165 धावांचे आव्हान उभे केले होते,
तर ते आवाहन हैदराबाद ने 18.3 षटकात तीन गड्यांच्या मोबदल्यात पार केले. तर यामध्ये सलामीवीर जेसन रॉय याला त्याच्या जोरदार अर्धशतकी खेळी मुळे सामनावीराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नाणेफेक जिंकून राजस्थानी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. त्यांची सुरुवात चांगली राहिली नाही. लेवीज सहा धावा करून तंबूत परतला. यानंतर यशस्वी जयस्वाल व कर्णधार संजू सॅमसन ने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. 36 धावा करून यशस्वी जयस्वाल त्रिफळाचीत झाला.
कर्णधार संजू समसन या सर्वाधिक 82 धावा केल्या. हैदराबाद कडून सिद्धार्थ कॉलने सर्वाधिक दोन गडी बाद केले. धावांचा पाठलाग करीत असताना हैदराबादची सुरुवात चांगली राहिली. सलामीवीर जेसन रॉय व वृद्धिमान साहा यांनी संघाला अर्धशतकी सलामी करून दिली. त्यानंतर जेसन रॉय व कर्णधार केन विल्यमसन यांनी अर्धशतकी भागीदारी करून संघाचा विजयाचा पाया मजबूत केला.
जेसन रॉय 60 धावा करून बाद झाला तर कर्णधार केन विल्यमसन 51 धावा करून नाबाद राहिला. राजस्थान कडून मुस्तफिजुर रहमान, चेतन साकरीया व महिपाल लोमारोर ने प्रत्येकी एक गडी बाद केला. उद्या केकेआर समोर दिल्लीचे आवाहन असणार आहे.