शुक्रवारी (दि. 31 मार्च)आज आयपीएल 2023 चे थाटात उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन सामना चेन्नई आणि गुजरात दरम्यान झाला. या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मराठमोळा ऋतुराज गायकवाड याची पहिल्या डावातील खेडी ही पहिल्या दिवशीचा आकर्षण ठरली. त्याने मात्र 50 चेंडू 92 धावा केल्या.
चेन्नई ला वीस षटकात178 धावा पर्यंत मजल मारता आली. ऋतुराज शिवाय मोईन अली यानेही 23 तर शिवम दुबे ने 19 धावांचे योगदान दिले. तर गुजरात कडून राशीद खान मोहम्मद शामी आणि अल्जारी जोसेफ यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर गुजरातला 179 धावांचे लक्ष दिले आहे. गुजरात मध्ये हार्दिक पांड्या शुभमन गिल केन विल्यम्सन सारखे जागतिक दर्जाचे खेळाडू असल्याने हा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे
प्रत्येक आयपीएल हंगामात पहिले अर्धशतक करणारे फलंदाज
2008 – ब्रेंडन मॅक्युलम
2009 – सचिन तेंडुलकर
2010 – अँजेलो मॅथ्यूज
2011 – श्रीकांत अनिरुद्ध
2012 – रिचर्ड लेव्ही
2013 – माहेला जयवर्धने
2014 – मनीष पांडे
2015 – रोहित शर्मा
2016 – अजिंक्य रहाणे
2017 – मोझेस हेन्रीक्स
2018 – ड्वेन ब्रावो
2019 – डेविड वॉर्नर
2020 – अंबाती रायुडू
2021 – सुरेश रैना
2022 – एमएस धोनी
2023 – ऋतुराज गायकवाड*