मार्क वुडचा भेदक मारा, लखनऊ ने दिल्लीला नमविले.

आयपीएल मध्ये दोन सामने खेळविण्यात आले दुसऱ्या सामन्यांमध्ये लखनऊ ने दिल्लीला पन्नास धावांनी नमविले आहे. सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचा हा निर्णय अपयशी ठरला. लखनऊ मे 20 षटकात 193 धावा पर्यंत मजल मारली. मायर्स ने सर्वाधिक 73धावा केल्या. यात सात षटकारांचा समावेश आहे. पुरण नेही 36 धावांचे योगदान दिले.

धावांचा पाठलाग करीत असताना डेव्हिड वार्नर ने एकाकी झुंज दिली मात्र त्याला योग्य ती साथ न मिळाल्यामुळे दिल्ली 20 षटकात 143 धावांपर्यंतच मजल मारू शकला. वॉर्नरने सर्वाधिक 56 धावा केल्या तर रुसूने 30 धावा केल्या. दिल्लीच्या तब्बल सात खेळाडूंना दुहेरी आकडा गाठता आला नाही. लखनऊ कडून मार्क वुडणे पाच गाडी बाद केले.

यंदाच्या सत्रात एका सामन्यात पाच गडी घेणारा वुड हा पहिला गोलंदाज ठरला. मार्क वुडला सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

You might also like

Comments are closed.