चहलचा भेदक मारा, राजस्थान ने हैदराबादला नमविले.

आयपीएल मध्ये सुपर संडे आहे. आज दोन सामने खेळविला जाणार आहे पहिल्या सामन्यात हैदराबाद समोर राजस्थानचे आवाहन आहे. सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मात्र जॉस बटलर आणि जयस्वालने हा निर्णय फेल ठरविला. राजस्थान ने पहिल्या डावात वीस षटकात तब्बल 203 धावा केल्या.जॉस बटलरने मात्र वीस चेंडू आपले अर्धशतक केले. तर जयस्वाल आणि कर्णधार सॅमसंन ने ही अर्धशतकी खेळी केली.

 

तळाला हेटमायेरणे उपयोगी 22 धावांचे योगदान दिले. तर हैदराबाद कडून नटराजन आणि फारुकीने प्रत्येकी दोन गडी बाद केले.धावांचा पडला करताना हैदराबाद ची सुरुवात चांगली राहिली नाही. त्यांचे महत्त्वाचे फलंदाज एकापाठोपाठ बाद होत गेले. एकही फलंदाजाला साजेशी खेडी करता आला नाही.

 

हैदराबादला 20 षटकात फक्त 131 धावा पर्यंत मजल मारता आली. राजस्थान कडून फिरकी गोलंदाज चहल ने सर्वाधिक चार गडी बात केले. बोल्ट नेही दोन गडी बात करून त्याला मोलाची साथ दिली. तर हैदराबाद कडून एकाही फलंदाजाला अर्धशतक करता आले नाही. दुसऱ्या सामन्यात मुंबई समोर बेंगलोरचे आवाहन असणार आहे.

You might also like

Comments are closed.