आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात बेंगलोर ने मुंबईचा आठ गड्यांनी दणदणीत पराभव केला आहे. बेंगलोर ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई कडून फक्त तीलकवर्माने एकाकी झुंज देत सर्वाधिक 84 धावा केल्या. त्याला कोणत्याही खेळाडूंनी योग्य अशी साथ दिली नाही. तरीही मुंबईने 20 षटकात 171 धावा पर्यंत मजल मारली. बेंगलोर कडून करण शर्माने सर्वाधिक दोन गडी बाद केल्या.
172 धावांचा पाठलाग करत असताना बेंगलोरला सलामी वीरांनी तुफान सुरुवात करून दिली. विराट कोहली 82 तर डुप्लेसीसने 73 धावांचे योगदान दिले. दोन्ही खेळाडूंच्या फटकेबाजीच्या बडावर बेंगलोर ने मुंबईचा दणदणीत पराभव केला आहे.
आतापर्यंतच्या 16 सीजन मधून अकरा सीझनमध्ये मुंबईने आपला पहिला सामना गमावला आहे. सामनाविराचा चा पुरस्कार कर्णधार डुप्लेसीस याला देण्यात आला आहे.