पुणे बॉईज स्पोर्ट्स संस्थेत प्रवेश घेण्यासाठी आज पासून क्रीडा चाचणी.

स्पोर्ट्स पॅनोरामा (प्रतिनिधी)-पुणे बॉईज स्पोर्ट्स संस्थेत प्रवेश घेण्यासाठी नाशिक येथे येत्या आज चार ऑक्टोबरपासून क्रीडा चाचण्यांचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे आणि आर्मी स्पोर्ट्स संस्थेच्यावतीने या जिल्हास्तरीय चाचण्या घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी दिली.

पुणे बॉईज स्पोर्ट्स ही नामवंत क्रीडा संस्था आहे. येथे प्रवेश घेण्यासाठी अनेक जण इच्छुक असतात. त्यासाठी येत्या चार ते आठ ऑक्टोबर दरम्यान नैपुण्य चाचणी होणार आहे.त्या अनुषंगाने जिल्ह्यातील खेळाडूंनी ड्रायव्हिंग,ऍथलेटिक्स ,बॉक्सिंग ,कुस्ती,तलवारबाजी,वेटलिफ्टिंग या खेळांच्या चाचण्यांमध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

लहान वयात मुलांना क्रीडा विषयक प्रशिक्षण देऊन आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावंत खेळाडूंची निवड करून त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलित आहार व अद्यावत क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुसंघटित प्रयत्न जिल्हा क्रीडा विभागामार्फत करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने या नैपुण्य चाचण्यांचे आयोजन विभागीय क्रीडा संकुल हिरावाडी, पंचवटी येथे आयोजन करण्यात आले आहे. ड्रायव्हिंग या खेळा साठी वयोमर्यादा 8 ते 10 वर्षे असून, ॲथलेटिक्स, बॉक्सिंग,कुस्ती,तलवारबाजी,वेटलिफ्टिंग या खेळासाठी वयोमर्यादा 10 ते 14 वर्षे असेल.

You might also like

Comments are closed.