छत्रपती संभाजीनगर (प्रतींनिधी): ईएमएमटीसी तर्फे आयोजित एटीएफ, एआयटीए आणि एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली ईएमएमटीसी – एमएसएलटीए एआयटीए 14 वर्षाखालील क्ले कोर्ट राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्या फेरीत छत्रपती संभाजीनगरच्या शिवराज जाधवची आगेकूच केली.
ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्स छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या शिवराज जाधव याने नमिश हुडचा 6-1, 6-4 असा पराभव करून दुसऱ्या फेरीत धडक मारली. शिवराज हा ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्स येथे सराव करतो. महाराष्ट्राच्या अव्वल मानांकित आराध्या म्हसदे याने दिल्लीच्या यश शर्माचा 6-2, 6-1 असा तर, महाराष्ट्राच्या अंश रमाणीने कर्नाटकच्या संजय कुमारचा 6-4, 6-3 असा पराभव केला. महाराष्ट्राच्या स्मित उंद्रेने हरियाणाच्या हर्ष मारवाहचे आव्हान 6-1, 6-0 असे मोडीत काढले.
चुरशीच्या लढतीत तिसऱ्या मानांकित राजस्थानच्या विवान मिर्धाने तेलंगणच्या निकुंज खुराणाचा 3-6,7-5, 6-4 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव केला. महाराष्ट्राच्या अकराव्या मानांकित प्रद्न्येश शेळकेने राम मगदूमचा 6-3, 6-1 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.
तसेच स्पर्धेचे उदघाटन छत्रपती संभाजीनगर महापालिका आयुक्त जी. श्रीकांत सज्जन(आयएएस ), एन्ड्युरन्स ग्रुपचे उपमहाव्यवस्थापक कॅप्टन कवी कंबन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्र प्रमुख आशुतोष मिश्रा, सुपरवायझर सर्वानन पॉलराज, मुख्य प्रशिक्षक प्रवीण प्रसाद, एन्ड्युरन्सचे अभिनव मिश्रा व प्रविण गायसमुद्रे आणि एन्ड्युरन्स सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पंर्धेचा आजचा निकाल खालील प्रमाणे
मुख्य ड्रॉ: पहिली फेरी: मुले:
- आराध्या म्हसदे[1] (महा) वि.वि.यश शर्मा(दिल्ली)6-2, 6-1;
- अंश रमाणी (महा)वि.वि.संजय कुमार (कर्नाटक) 6-4, 6-3;
- स्मित उंद्रे (महा) वि.वि.हर्ष मारवाह(हरियाणा) 6-1, 6-0;
- कबीर परमार [14](गुजरात) वि.वि.जीवीथ एस(कर्नाटक) 6-3, 6-4;
- वनिज पोथुनूरी[12](तेलंगणा) वि.वि.स्वर सोमवारपेठ(कर्नाटक)6-3, 7-5;
- सत्या चिंतागुंता (तेलंगणा) वि.वि.प्रवक्ष्य श्रीवास्तव (महा) 3-6, 6-3, 6-4;
- विराज चौधरी[7](दिल्ली) वि.वि.जय गायकवाड(महा) 6-2, 6-0;
- विवान मिर्धा[3](राजस्थान) वि.वि.निकुंज खुराणा(तेलंगणा)3-6,7-5, 6-4;
- ऋषव प्रसाद(पश्चिम बंगाल) वि.वि.कीर्तन विश्वास(तेलंगणा) 6-2, 6-3;
- वृषांक मुनुगला(तेलंगणा) वि.वि.सर्वज्ञ सरोदे (महा) 6-3, 6-1;
- आरव छल्लानी[15](महा) वि.वि.सुजई पोथुला(तेलंगणा)6-3, 6-2;
- वरद उंद्रे[9](महा) वि.वि.यश कुमार(कर्नाटक)6-3, 6-4;
- ध्रुव सेहगल(महा)वि.वि.अर्जुन कक्कर(उत्तर प्रदेश) 6-3, 6-0;
- कौस्तुभ सिंग(उत्तर प्रदेश) वि.वि.तहन गोसाई(हरियाणा) 6-1, 6-3;
- परंजय सिवाच[6](हरियाणा) वि.वि.माधव दाढीच(कर्नाटक) ६-३, ६-०;
- अथर्व श्रीरामोजू([8](तेलंगणा) वि.वि.अर्श वाळके(कर्नाटक) 6-4, 6-1;
- हेमदेव महेश (तामिळनाडू) वि.वि.अयान शंकर(तामिळनाडू) 7-6(1), 6-3;
- शिवराज जाधव (महा) वि.वि.नमिश हुड(महा) 6-1, 6-4;
- प्रद्न्येश शेळके [11](महा) वि.वि.राम मगदूम(महा)6-3, 6-1.