छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी): विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा, येथे क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय छत्रपती स्ंभजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरशालीय विभागीयस्तरीय १७ वर्षा आतील क्रिकेट स्पर्धामध्ये देवगिरी ग्लोबल अकॅडमी शाळेचा संघाने लिटल एंजेल स्कूलच्या (छत्रपती संभाजीनगर ग्रामीण विभाग) संघावर १० गडी राखून विजयी प्राप्त केला.
सेमी फायनल सामना मध्ये जालन्याच्या श्री योएगानंद माध्यमिक विद्यालया परतूर विरूद्ध देवगिरी ग्लोबल अकॅडमीच्या संघाने सहा गाडी राखून विजय मिळवत अतिम सामन्यात प्रथम गोलंदाजी करतांना देवगिरी ग्लोबल अकॅडमी संघाने गोलंदाजी करत लिटल एंजेल स्कूलच्या संघाला चार षट्काच्या सामन्या चार गाडी बाद करत २९ धावात रोखले. देवगिरी ग्लोबलच्या सलामी जोडीच्या फलंदाजाने दोन षट्कात 32 धाव केल्या यात कर्णधार राघव नाईक साजेसा खेळी करत १४ धावा केल्या तर संस्कार मुधा १३ धावा करत रोमहर्षक विजय प्राप्त करून् देण्यास योगदान राहिल्या तसेच राज्यस्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेसाठी संघाची निवड झाली आहे. संघ खालील प्रमाणे
कर्णधार – राघव नाईक, कबीर लांडगे, संस्कार मुथा, सुशांत यादव, आर्यन बन्स्वल, सर्वज्ञ राजुरे, दिव्याश गायकवाड, दक्ष बाबत, स्वराज रणसिंग, साईदीप वाघमारे, हर्ष चौरे, कृष्णाकांत पावडे, पृथ्वीराज निकम, गुरदत्त चौधरी, वीरसिंग राजपूत, जयेश लोहिया, अजिंक्य औसरमल या विजयी संघातील खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक सागर वाघ, सुनिल शेवरे, अंतरा हिरे आणि सुमित खरात यांचे मार्गदर्शन लाभले.
खेळाडूंच्या यशाबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सतीश चव्हाण, देवगिरी ग्लोबल अकॅडमी शाळेच्या स्थानिक नियमक मंडळाचे अध्यक्ष किरण आवरगावकर, देवगिरी ग्लोबल अकॅडमी शाळेचे प्राचार्य दत्तात्रय चव्हाण, उपप्राचार्य प्रीती साखरे आणि सर्व शिक्षक वृंदांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.