औरंगाबाद (प्रतिनिधी) महाराष्ट्राचे उद्योग मंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा व औरंगाबाद महानगरपालिकेच्या विकास प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या विविध विकास कामाच्या प्रकल्पाचे सादरीकरण मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले.
सदरील हाती घेण्यात आलेल्या विकास कामात दीडशे कोटी रुपयाचे रस्ते, संत एकनाथ ,संत तुकाराम नाट्यगृह ,क्रांती चौक येथील भव्य छत्रपती शिवाजी महाराज पूर्णकृती पुतळा ,स्व.बाळासाहेब ठाकरे स्मारक स्मृती उद्यान ,इ गव्हर्नन्स प्रकल्प, हर्सूल कचरा प्रक्रिया प्रकल्प,नेहरू भवन पुनर्विकास ,जंगल सफारी पार्क, ऐतिहासिक दरवाज्यांचे पुनर्विकास, ऐतिहासिक शहागंज क्लॉक टावर,गरवारे स्टेडियम विकास डीपीआर,खाम नदी पुनर्जीवन टप्पा 2 डीपीआर,
हेही वाचा: तरुणांनी व्यसनापासून दूर राहून मैदानी खेळावर जास्त लक्ष केंद्रित करावे-जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
ते म्हणाले की, औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने शहर विकासाचे विविध २१ प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यापैकी ९० टक्के प्रकल्पाची कामे पूर्ण झाली आहेत, उर्वरीत कामे लवकरच पूर्ण होतील. दरम्यान गरवारे स्टेडियम येथे हॉकी, बास्केटबॉलसाठी 50 कोटी, छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम, स्वातंत्र्यवीर सावरकर संशोधन केंद्र, गरवारे स्टेडियम विकास, सातारा देवळाई व गुंठेवारी भागात ड्रेनेज लाईन व नवीन रस्त्यासाठी तीनशे कोटी आदी विविध विकास प्रकल्पासाठी ७८२ कोटींची मागणी शासनाकडे केली असल्याचे मनपा प्रशासक अस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले.