औरंगाबाद:- औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अंबादास गायकवाड यांनी युरोप खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट एल्ब्रुस ( रशिया ) 18510 फूट येथे 15 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 8.15 मिनिटानी भारतीय तिरंगा ध्वज फडकावून स्वातंत्र्य दिवस साजरा केला असून त्यांच्या या मोहीमेसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय ध्वज व हिरवा झेंडा दाखवुन मोहीमेसाठी शुभेच्छा दिल्या होत्या.
युरोप खंडातील सर्वोच्च 18510 फूट उंचीच्या माउंट एल्ब्रुस या शिखरासाठी प्रत्यक्षात चढाई १२ ऑगस्ट रोजी आझु या टाऊन पासून गिर्यारोहक अंबादास यांनी सुरु केली होती. 12/8/21 रोजी कँप एक, 13/8/21 रोजी बेस कँपवर तर 14/8/21 रोजी रात्री 11 वाजता पुन्हा चढाई सुरु केली होती.
कमाल 20 तापमानात आणि जोरात सुसाट 90/100 च्या वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यात सकाळी 9 वाजल्यापासून स्नोफॉल चालू होते. गाईड ने सांगितल्या प्रमाणे वातावरण 17 तारखेला नॉर्मल होईल सांगितले, परंतु आपल्या देशाचा तिरंगा ध्वज या शिखरावर फडकावून स्वातंत्र्य दिवस साजरा करणे हाच एक मुख्य उद्देश असल्यामुळे गाईड ला विनंती केली आणि त्यांना सांगितले की माझ्यासाठी 15 ऑगस्ट हा दिवस माझ्या जिवापेक्षा महत्वाचा आहे. एक संधी घेऊ या, विचार करून गाईड ने होकार दिला, भारत माता की जय म्हणत बॅग आवरून चढाई ची तयारी केली, दिनांक 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी सकाळी 8.15 वाजता 18510 फूट भारतीय ध्वज फडकवत असताना मला लाल किल्ला येथील आठवण झाली. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील तिरंगा ध्वज फडकावून स्वातंत्र्य दिवस साजरा करत असतानाचे चित्र माझ्या डोळ्यासमोर आले असल्याचे सांगत गिर्यारोहक अंबादास म्हणाले कि, माझ्या डोळ्यातून अश्रु धारा सुरु झाल्या. माझे कुटुंब आठवले, मी खूप भावूक होऊन रडू लागलो गाईडने समजावून सांगितले अर्ध्या तासामध्ये परतीचा प्रवास सुरू केला पाहिजे बर्फाचा पाऊस व जोऱ्याचा वारा याचा वेग वाढतच होता. शेवटी गाईड ला सेटेलाईट फोन, वॉकी-टॉकी वरती निरोप आला लवकरात लवकर खाली निघा 1 तास चालल्यानंतर वादळात रस्ता चुकलो डाव्या पायाची तीन बोटे सुन्न पडले, मनात वेगवेगळे भीतीचे विचार, कुटुंबाचे विचार चालू झाले.
वादळ नॉर्मल होण्याऐवजी वाढतच होते. समोरचे काहीदिसेनासे झाले गाईड ने थांबण्यास सांगितले 4 तास बर्फावर्ती तसेच आइसॅक्स बर्फात रोऊन पडून राहिलो, वादळ कमी झाल्याचे गाईड सांगताच पुन्हा खाली उतरण्याची सुरुवात केली, ताकद खूप कमी झाल्याचे जाणवत होते, दोन वेळेस 500 फूट दरीत कोसळताना वाचलो, परंतु तिसऱ्यांदा 50 फूट दरीत बर्फात पडलो सेफ्टी रोप असल्यामुळे गाईड ने तत्काळ रोप ब्लॉक केली आणि वाचलो,शेवटी बेस कँप वरती आल्यानंतर मोहीम फत्ते झाली आणि 18510 फूटवरती स्वातंत्र्य दिवस साजरा केल्याचा क्षण जीवनात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला.
या मोहिमेसाठी भारत सरकार, इंडियन आर्मी, महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री, आरोग्य विभाग, महाराष्ट्र पोलिस, मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, पत्रकार समुह, सेवाभावी संस्था, रक्तदाते, कोरोना योद्धा, डॉक्टर समूह,मनपा सफाई कामगार तसेच विवीध सामाजिक घटक ज्यांचे कोविड- १९ या महामारीच्या काळात अमुल्य योगदान आहे. या सर्वांना याचे श्रेय जाते असे गिर्यारोहक अंबादास म्हणाले.
अंबादास गायकवाड प्रतिक्रिया
जीवनात सर्वात जास्त आनंद आणि गर्व तेव्हाच होतो जेव्हा आपल्या देशाचा तिरंगा ध्वज दुसऱ्या देशात जाऊन अभिमानाने फडकावण्याचा मान आपल्याला मिळतो सर्व भारतीयांना स्वतंत्र दिवस व अमृत सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त शुभेच्छा. बेटी बचाव बेटी पढावो” देशातील सर्व मुली शिक्षित झाल्या पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचे व देशाचे नाव जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, मलाही दोन मुली आहेत, माझ्या मुलींनी चांगले शिक्षण घेऊन देशाची सेवा करावी असे मला वाटते.त्यांना सदरची मोहीम समर्पित करण्यात येत आहे असे अंबादास यांनी सांगितले. अपमानातूनच माणसांना जगण्याची धेय गवसल्याची उदाहरणे आपल्याला वाचायला पाहायला मिळतात, मग आपण अपमानाने खचून का जाव उलट जिद्दीने पेटून उठाव अशा ठिकाणी उभ राहावे जिथून कोणी हलवणार नाही, अशा ठिकाणी बसावे जिथून कोणी उठवणार नाही, आणि अशा उंचीवर पोहचावे जिथं कोणीही पोहचणार नाही अश्या प्रकारे स्वप्न आहे.