औरंगाबाद:- आदित्य तळेगावकर ( शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त, आंतररष्ट्रीय जिमनॅस्टिक खेळाडू ) याचे मागच्या वर्षी २४ ऑगस्ट ला वयाच्या २४ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले होते. कौटुंबिक परिस्तिथी हलाखीची असूनसुध्दा त्याने खूप यश मिळवल होत. ‘साऊथ कोरिया’ मध्ये ‘वर्ल्ड जिमनॅस्टिक चॅ्पियनशिप’ साठी भारताचे प्रतिनधीत्व त्याने केले होते. वयाच्या ४ वर्षापासूनच आदित्यने जिमनॅस्टिक्सचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने लहानपणातच अनेक जिल्हास्तरीय आणि राज्य स्तरीय स्पर्धा ही गाजवल्या. पुढे आंतररराष्ट्रीय स्पर्धा खेळण्यासाठी तो मेहनत करू लागला आणि त्या साठी त्याची निवडही झाली.पण ती स्पर्धा होणार होती “साऊथ कोरिया” ला. आता या विदेशवारी साठी लागणारा खर्च ऐपती पलीकडचा होता. त्यावेळी वडिलांनी त्याच्या पाठीवर हात ठेवत त्याला धीर दिला आणि वडिलांनी पहाटे ५ ते रात्री १ पर्यंत रिक्षा चालवून त्याला शेवटी वर्ल्ड चॅम्पयनशिपला पाठवलेच.
वडील रिक्षा ड्रायव्हर आणि आई कंपनी मध्ये कामाला, घरात लहान बहीण अशी परिस्थीती असून तो थांबला नाही. पुढे अजून खूप यश मिळवायचं ही जिद्द मनात ठेवून तो धडपड करत राहिला पण ते यश मिळण्याआधीच काळाने आदित्यवर झडप घातली. त्याच अस जाणं सगळ्यांच्या मनाला चटका लावून गेल. “परिसथिती कशीही असली तरी जिद्द आणि चिकाटीने आपण पुढे जाऊ शकतो” हे तो सगळ्यांना शिकवून गेला.
२४ ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेला आदित्यला आदरांजली देण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. तरी आपण एमजे बॉईज डान्स अकॅडमी, पीर बाझार, एकनाथनगर रोड, उस्मानपुरा येथे येऊन आदरांजली द्यावी.